December 25, 2024 9:30 AM

views 13

येत्या 24 तासात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता

येत्या 24 तासात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या भागातल्या शेतकऱ्यांनी कृषिविषयक सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून त्यानुसार नियोजन करावं, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.  

December 23, 2024 1:32 PM

views 20

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीची तीव्र लाट सुरु आहे. हवामान विभागानं, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. श्रीनगरमध्ये काल रात्री निचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून डोंगराळ भागात सर्वत्र बर्फ साचला आहे. पंजाबच्या आदमपूर मध्ये १ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिल्ली आणि परिसरात थंडीबरोबरच हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या तर सर्वत्र दाट धुके साचले आहे. धुक्यामुळे अमृतसर आणि ...

December 22, 2024 3:24 PM

views 20

राज्यात हवामान कोरडं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आजही हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्यात या सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे.    दरम्यान, सूर्याच्या उत्तरायणाला काल २१ डिसेंबरला प्रारंभ झाला. इथून पुढे हळूहळू दिवसाचा कालावधी वाढत जातो. सूर्य काल मकरवृत्तावर असल्यानं कालचा डिसेंबरचा दिवस हा सर्वात लहान म्हणजे अकरा तासांचा तर, रात्र तेरा तासांची होती. उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू झाल्यानंत...

December 21, 2024 4:37 PM

views 12

हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मिरमध्ये पुढच्या ५ दिवसांत थंडीची तीव्र लाट

  हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मिरमध्ये पुढच्या पाच दिवसांत थंडीची तीव्र लाट येईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पंजाब आणि राजस्थानमध्येही सोमवारपर्यंत हीच परिस्थिती असेल. हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान आणि झारखंडच्या काही भागात उद्यापर्यंत  दाट धुकं पडेल, तर  दिल्लीमध्ये पुढचे दोन दिवस संध्याकाळी आणि रात्री हलकं धुकं पसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीत आज सकाळी धुक्याची हलकी चादर पसरली होती. दरम्यान, मध्य भारतात पुढच्या चार दिवसांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होणार अ...

December 19, 2024 3:17 PM

views 16

देशात विविध भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता

येत्या दोन दिवसांमध्ये तापमान मध्य भारतात तीन ते चार अंश सेल्शिअसने तर देशाच्या पूर्व भागात दोन ते तीन अंश सेल्शिअसने वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.   वायव्य भारतात पुढचे पाच ते सहा दिवस थंडीची लाट पसरेल. हिमाचल प्रदेश पूर्व राजस्थान आणि पंजाब मध्ये येत्या दोनतीन दिवसांमध्ये थंड ते अतीथंड हवामान असेल तर पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश इथल्या काही भागांमध्ये सकाळ संध्याकाळ दाट धुकं आणि राजधानी दिल्लीत  पहाटे धुरकं असेल असं विभागानं म्हटलं आहे.   दरम्यान काश्मीरमध्ये कडाक...

December 17, 2024 10:16 AM

views 77

देशात अनेक राज्यांमध्ये तीव्र थंडीची लाट

मध्य प्रदेश आणि राजस्थानसह उत्तरेकडील अनेक राज्यात आजपासून पुढील २ ते ३ दिवस तीव्र थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तरेकडील सिक्कीम, आसाम आणि मेघालयमध्ये धुकं राहील. तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि रायलसीमा भागात वीजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

December 15, 2024 7:38 PM

views 654

येत्या दोन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

गेल्या चोवीस तासात, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय तर किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं ६ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.    येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.    परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून आज सर्वाधिक नीचांकी ४ पूर्णांक ६ शतांश अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद...

December 14, 2024 7:37 PM

views 15

नाशिक मध्ये आज ९ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद

नाशिकचा पार आज दोन अंशांनी घसरल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीने डोकं वर काढलं आहे. आज ९ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. थंडीचा रब्बी पिकांना चांगलाच फायदा होत असल्यानं शेतकरी वर्ग आनंद व्यक्त करत आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत ८ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे.

December 9, 2024 4:11 PM

views 14

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचं पुनरागमन

गेले काही दिवस उकाडा जाणवत असताना कालपासून राज्यात थंडीचं पुनरागमन झालं आहे. अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ हवामान तयार होऊन अवकाळी पाऊस पडला तसंच  तापमानात वाढ झाली होती. मात्र, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे  मुंबईसह नाशिक, पुणे इत्यादी भागात थंडीचा जोर  वाढला आहे. मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर तापमान १३ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस, नाशिक शहरात ९ पूर्णांक ४ दशांश तर निफाडमध्ये ६ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काळात तापमान आणखी क...

December 8, 2024 7:26 PM

views 16

राज्यात पुन्हा गारठा वाढणार

गेल्या आठवड्यात तामिळनाडूच्या समुद्रात तयार झालेल्या फेंजल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर आता पुन्हा राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांत राज्यात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली, तरी उर्वरित भागात हवामान कोरडं व्हायला सुरुवात झाल्यानं आता राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. नाशिक मध्ये पुन्हा थंडी वाढली असून एकाच दिवसात पारा चार अंश सेल्सिअसने घसरला.