January 19, 2025 8:29 PM January 19, 2025 8:29 PM
8
देशातल्या काही भागात हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता
पश्चिमी वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमालयाच्या पश्चिमी रांगांमधे पुढचे ५ दिवस हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्रविभागाने वर्तवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेशचा पश्चिम भाग, दिल्लीतलं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर राजस्थान या ठिकाणी येत्या २२ आणि २३ तारखेला पाऊस पडेल. पुढच्या ३ दिवसात वायव्य भारतात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसची वाढ होण्याची शक्यता आहे. त्याखेरीज बिहार, ओदिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरात प...