March 16, 2025 8:06 PM March 16, 2025 8:06 PM

views 15

देशाच्या विविध भागात उन्हाचा कडाका !

येत्या दोन दिवसात विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तर तेलंगणा, पश्चिम बंगाल, सौराष्ट्र तसंच कच्छ या भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. ओदिशालाही आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला असून पुढचे दोन दिवस झारखंड आणि पश्चिम बंगालला यलो अलर्ट देण्यात आहे.   दरम्यान, उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेशात पुढच्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्य...

March 14, 2025 10:58 AM March 14, 2025 10:58 AM

views 11

विदर्भासह पश्चिम भारतात उष्णतेची लाट

पश्चिम भारतात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सौराष्ट्र, कच्छ, विदर्भ, छत्तीसगड राज्यात पारा चढलेला असेल, तर जम्मू काश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशान्य भारतात अनेक ठिकाणी गारांच्या पावसाबरोबरच वादळाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

March 9, 2025 1:47 PM March 9, 2025 1:47 PM

views 14

पुढच्या दोन दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता

पुढच्या दोन दिवसांत कोकण, गोवा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज वर्तवला आहे. उद्या जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशातही वादळाची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही अशीच परिस्थिती राहणार आहे.

March 5, 2025 3:50 PM March 5, 2025 3:50 PM

views 6

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा

देशाच्या उत्तरेकडच्या डोंगराळ भागात अलिकडेच झालेल्या हिमवृष्टीचा तसंच पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम दिसत आहे. राजस्थान, दिल्ली, हरयाणा आणि उत्तरप्रदेशचा पश्चिमेकडचा भाग थंडीच्या अमलाखाली आहे. थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढचे दोन दिवस या भागात तापमान कमी राहील असा हवामानविभागाचा अंदाज आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्किम आणि पश्चिम बंगालचा हिमालयातला भाग इथं पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तसंच गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आ...

February 27, 2025 1:11 PM February 27, 2025 1:11 PM

views 12

देशात काही भागात पावसाची शक्यता

देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात पश्चिमी वाऱ्यांच्या प्रकोपामुळे पावसाची शक्यता आहे. काश्मीरच्या डोंगराळ भागात कालपासून हिमवृष्टी होत असून त्यामुळे नदी नाल्यांमधे पाणी वाढलं आहे. गुलमर्ग इथं दोन ते तीन फूट जाडीचा बर्फाचा थर साचला असून त्यामुळे स्थगित झालेल्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा सुरु होण्याची शक्यता आहे.  काश्मीर खोऱ्यात पुढचे दोन दिवस हिमवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशातही हिमवृष्टी होत असून राज्यातल्या महत्त्वाच्या महामार्गांवर किमान एक फूट ...

February 13, 2025 2:36 PM February 13, 2025 2:36 PM

views 8

देशातल्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा

आसाम, मेघालय आणि अरुणाचलप्रदेशमध्ये उद्यापर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि हिमवर्षाव होईल, तर अरुणाचल प्रदेशाच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तसंच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ भागातही उद्यापर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.    पश्चिमेकडचे जोरदार वारे जम्मू-काश्मीर आणि खालच्या उष्णकटिबंधीय भागात चक्रीवादळाच्या स्वरूपात सक्रिय आहेत. त्याच्या प्रभावामुळे येत्या शनिवारपर्यंत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्य...

February 6, 2025 7:34 PM February 6, 2025 7:34 PM

views 11

विदर्भात, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १४ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वत्र हवामान कोरड राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.  

February 5, 2025 7:33 PM February 5, 2025 7:33 PM

views 15

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं १३ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

January 21, 2025 1:44 PM January 21, 2025 1:44 PM

views 8

हिमालयाच्या पश्चिम भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज हिमालयाच्या पश्चिम भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पुढचे २ ते ३ दिवस पंजाब, हरयाणा, चंदिगढ, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा प्रकोप अद्यापही कायम आहे. श्रीनगरमध्ये किमान तापमान १ अंश सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं आहे. कश्मीरच्या अन्य भागात तापमान शून्याच्या खाली गेलं असून लारनू या भागात सर्वात कमी उणे ६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. कुपवाडा भागात झाल...

January 20, 2025 1:31 PM January 20, 2025 1:31 PM

views 6

देशात काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

तामिळनाडूतल्या तुरळक भागासह पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोमोरिन परिसर आणि लगतच्या दक्षिण श्रीलंकेच्या किनारपट्टीवर ताशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मच्छिमारांना या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.