April 28, 2025 1:15 PM

views 18

देशात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता

  आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळमध्ये तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणा सोडून देशाच्या सर्व भागांमध्ये तापमान सामान्य किंवा थोडंफार अधिक राहण्याची शक्यता असून नवीदिल्लीत १ मे पासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.    झारखंडमधल्या अनेक भागांसाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून येत्या १ मे पर्यंत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासाठी यल...

April 22, 2025 1:24 PM

views 11

विदर्भासह उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

विदर्भ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढले दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.   कोकण, मराठवाडा, गोवा, गुजरात, बिहार, झारखंड, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि रायलसीमा मध्ये आज उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे.   अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

April 15, 2025 6:45 PM

views 18

यंदा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज

यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ५ टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्यूंजय मोहपात्रा यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत  ही माहिती दिली.    यावर्षी पाऊस सरासरीच्या  १०५ टक्के होण्याचा अंदाज आहे. १९७१ ते २०२० या काळात पावसाचं सरासरी प्रमाण ८७ सेंटीमीटर इतकं होतं. यावर्षी मात्र सरासरीच्या ५ टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचं मोहपात्रा यांनी सांगितलं. देशातल्या अनेक भागात सामान्य ते सामान्यापेक्षा अधिक पाऊस...

April 11, 2025 9:41 AM

views 20

बिहारमध्ये पावसामुळे २८ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये काल अनेक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाल्याच वृत्त आहे. राज्यातील नालंदा , जहानाबाद, मुज्जफरपूर, आरारिया आणि बेगुसराई या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. नालंदा जिल्ह्यात पावसामुळे सर्वात जास्त 18 जणांचा मृत्यू झाला असून, बिहार शरीफ इथ एका मंदिराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले .   इस्लामपूर , सिलाओ, राहुई , गरियक इथही वीज अंगावर कोसळून झालेल...

April 7, 2025 12:59 PM

views 22

देशातल्या ‘या’ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओदिशातल्या २१ शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशासह अन्य भागांतही उष्णतेच्या झळा तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुजरातमध्ये कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये रात्रीही तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित गुजरात, उर्वरित राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशाचा पश्चिम ...

April 1, 2025 8:47 PM

views 22

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यातल्या बहुतेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामानखात्यानं दिला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.   येत्या दोन दिवसांसाठी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच अकोला, अमरावती , बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, बीड, लातूर, भंडारा, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमधे अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्...

March 31, 2025 1:14 PM

views 31

‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील 4 दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान संस्थेने 1 ते 3 एप्रिल दरम्यान पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तेलंगणा आणि कर्नाटक येथेही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

March 30, 2025 3:08 PM

views 25

देशात ‘या’ भागात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकातल्या उत्तर भागात पुढच्या आठवड्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम बंगाल आणि ओदिशात आज उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. इशान्य भारतात पुढील तीन चार दिवस  कमाल तापमानात अंदाजे पाच ते सहा अंश सेल्सिअसने वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

March 24, 2025 7:58 PM

views 27

देशात ‘या’ भागात पावसाचा इशारा

येत्या तीन दिवसात जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, केरळ, लडाख, गिलगिट, मुजफ्फराबादमधे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. येत्या २६ आणि २७ तारखेला उत्तराखंडमधेही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.   गुजरात, तमीळनाडू, पुदुच्चेरी, आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान राहील. तर, इशान्य भारताच्या मैदानी भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसनं वाढ होईल, असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

March 22, 2025 2:54 PM

views 26

पूर्व आणि ईशान्य भारतात मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहतील- हवामान विभाग

पूर्व आणि ईशान्य भारतात उद्यापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याच काळात दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळतील.    मध्य महाराष्ट्र, पूर्व मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आणि ओदिशामध्ये आज वादळी वाऱ्यांसह  हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.    ईशान्य भारतात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये, तर  दक्षिणेकडे तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, लक्षद्वीप, आंध...