August 12, 2024 8:16 PM August 12, 2024 8:16 PM
16
तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानात पुढचे तीन दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
पुढचे तीन दिवस तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थान याभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि रायलसीमा या भागांतही आज मुसळधार पाऊस पडेल. तसंच, हिमालयाच्या पश्चिमेकडचा प्रदेश तसंच पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या सहा ते सात दिवसात वायव्य भारताच्या सपाट भूभागावरही पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.