January 22, 2026 1:53 PM

views 4

मध्यप्रदेश आणि राजस्थानात आज जेरदार पाऊस

देशाच्या उत्तर भागात पश्चिमेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांना काहीसा पायबंद बसला आहे. हिमाचल प्रदेशात हवामान कोरडं असून मोसमातल्या पहिल्या हिमवृष्टीची प्रतीक्षा पर्यटक करीत आहेत. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमधे कडाक्याची थंडी आहे. तापमापकातला पारा लडाखमधे उणे ११ च्या आसपास पोहोचला तर काश्मीरमधे उणे ६ पर्यंत घसरला. मध्यप्रदेश आणि राजस्थानात आज जेरदार पाऊस

December 31, 2025 1:51 PM

views 24

देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर

देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर देशाच्या उत्तर भागात थंडीचा कडाका वाढला आहे. जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमालयीन प्रदेशात हिमवृष्टी होत आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या अभावामुळे राजधानी दिल्लीसह उत्तरेच्या राज्यांमधे तापमानात घट झाली असून धुक्याची दाट चादर पसरली आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  दिल्ली विमानतळावरची १४८ उड्डाणं आज रद्द करण्यात आली. उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड ही राज्य थंडीने ग...

November 17, 2025 10:09 AM

views 43

मध्य भारतात दोन दिवस थंडीची लाट तर दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज

आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, विदर्भासह छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, आंध्र प्रदेश, केरळ आणि माहेमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

October 10, 2025 3:46 PM

views 43

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातून माघारीचा प्रवास

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातून माघारीचा प्रवास आजपासून सुरू झाला. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर आणि मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे यासारख्या परिसरातून मान्सूननं माघार घेतली आहे. येत्या काही दिवसात राज्याच्या इतर भागातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

August 25, 2025 10:46 AM

views 47

हिमाचलप्रदेशात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊसाचा जोर सुरूच आहे, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूर, ठिकठिकाणी पाणी साचणं आणि भूस्खलनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्य आपत्कालीन केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि 482 रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत.   अनेक भागातील वीजपुरवठाही प्रभावित झाला आहे, 941 जनित्र आणि 95 पिण्याच्या पाण्याच्या योजना विस्कळीत झाल्या आहेत. हवामान खात्याने या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता वर्...

August 22, 2025 1:33 PM

views 16

देशातल्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा

अरुणाचल प्रदेश, बिहार, पूर्व राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, उत्तराखंड, आणि मध्यप्रदेशात आज जोरदार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यांमध्येही येत्या २ ते ३ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ईशान्येकडच्या राज्यांसहित उत्तर भारतात काही ठिकाणी, तसंच ओडिशा आणि तेलंगणात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, ओडिशा, सौराष्ट्र आणि कच्छ भागात सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज व्यक्त के...

August 20, 2025 3:02 PM

views 10

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य प्रदेशाच्या आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं उत्तर कर्नाटकात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बेळगाव आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये सतत जोरदार वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.    उत्तराखंडाच्या विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर आज कमी झाला आहे. हवामान खात्यानं येत्या काही दिवसांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट जारी केला आहे. पुढचे तीन दिवस उत्तराखंड राज्यात अनेक भागात मध्यम ते म...

July 6, 2025 7:35 PM

views 9

येत्या दोन दिवसांत कोकण, विदर्भ, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहायची शक्यताही व्यक्त केली आहे.

June 27, 2025 4:20 PM

views 8

हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

येत्या चोवीस तासांसाठी हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मिळाला असून लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना आहेत. वर्धा जिल्ह्यात दिगडोह इथं पूर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यात मुसळधार पावसामुळे समृद्धी महामार्गावर पुलाखाली पाणी साचल्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला.

June 12, 2025 7:30 PM

views 22

येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज तर रत्नागिरी जिल्ह्याला उद्या आणि परवा जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा, अमरावती, चंद्रपूर, अकोला, गोंदिया, आणि  नागपूर या जिल्ह्यांना उद्या आणि परवासाठी ऑरेंज अलर्ट आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी परवा ऑरेंज अलर्ट हवामानविभागाने दिला आहे.