May 22, 2025 10:10 AM

views 15

देशातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये पुढच्या 2-3 दिवसांत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. ईशान्येकडील राज्यांही येत्या रविवारपर्यंत जोरदार पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तराखंड राज्यांत तसंच दिल्ली राजधानी क्षेत्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसंच, यावर्षी मोसमी पावसाचं आगमन लवकर होणार असून केरळमध्ये तो येत्या 2-3 दिवसांत पोहोचेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

May 19, 2025 11:09 AM

views 23

केरळ किनारपट्टी भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पुढचे पाच दिवस कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ तसंच आसपासच्या भागात जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या हिमालयीन भागातही वादळी वारे आणि वीजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.   राजस्थानच्या पश्चिम भागात मात्र आणखी चार दिवस उष्णतेची लाट कायम राहील तर ओडीशामध्ये उष्ण आणि दमट हवामान असेल. येत्या दोन दिवसांत जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस...

May 12, 2025 11:46 AM

views 19

देशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

देशात पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी हवामान विभागानं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम मेघालय आणि पंजाबमध्ये गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता आहे.   मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या सात दिवसांत मध्य भारतात कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे.

May 10, 2025 12:55 PM

views 18

देशात ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

देशाच्या वायव्य, मध्य आणि पूर्व भागात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून, ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशात आज, तर आसाम, मेघालय, मणिपूर, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या पर्वत रांगांमध्ये उद्या जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.  येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात कमाल तापमानात टप्प्याटप्प्याने दोन ते चार अंश सेल्सिअस वाढ होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

May 5, 2025 1:35 PM

views 15

गुजरात, आंध्र प्रदेश आणि ओदिशामध्ये आज मुसळधार पाऊसाचा अंदाज

गुजरात, आंध्र प्रदेश आणि ओदिशामध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. तर बिहार, ओदिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आसाम, मणिपूर आणि पश्चिम बंगाल मध्ये उद्या मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ मध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील, असं वेधशाळेनं कळवलं आहे. छत्तीसगढ, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात, ओदिशा आणि उत्तराखंड इथं आज गारपीट  होण्याचा अंदाज आहे.

May 1, 2025 7:36 PM

views 12

गेल्या चोवीस तासात राज्यात ठिकठिकाणी तापमानात वाढ

गेल्या चोवीस तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली.    राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं ४५ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.   येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

April 25, 2025 10:26 AM

views 21

देशाच्या वायव्य भागात उष्णतेची लाट; तर इशान्येकडे मुसळधार पावसाची शक्यता

हवामान - आगामी  तीन ते चार दिवस वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगण इथे उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.   तर रविवारपर्यंत पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

April 24, 2025 1:58 PM

views 8

देशातल्या ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता

उत्तर प्रदेश, बिहार ओदिशा, झारखंड, छत्तीसगढ,विदर्भ आणि पश्चिम बंगालचा काही भाग इथे येत्या शनिवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. ईशान्य भारतासह, पूर्व राजस्‍थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्‍ली इथे हवेतला उष्मा कायम राहण्याचा तर पूर्वेकडे तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण भारतात या काळात  कर्नाटक, आंध्र किनारपट्टी, रायलसीमा, केरळ, तामिळनाडू या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा हवामानखात्याचा अंदाज आहे. 

April 12, 2025 2:51 PM

views 15

भारता मध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागांनं जम्मू-काश्मीर, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी पुढील चार दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये ताशी ५०ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.

February 6, 2025 7:34 PM

views 14

विदर्भात, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १४ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वत्र हवामान कोरड राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.