September 8, 2024 1:50 PM September 8, 2024 1:50 PM

views 8

देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा

देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेशाचा किनारी भाग आणि यानम इथे आज अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओदिशा इथे उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मध्य प्रदेश, छत्तीसगड , कोकण, गोवा , विदर्भ , कर्नाटकाचा किनारी भाग आणि पूर्व उत्तर प्रदेश इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

August 5, 2024 9:59 AM August 5, 2024 9:59 AM

views 18

महाराष्ट्रात पुण्यासह अन्य भागात जोरदार पाऊस, पूरस्थितीमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात काल पुण्यासह अन्य काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या काही भागाला काल पुन्हा जोरदार पावसानं झोडपून काढलं. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. धरणातून मुठा नदीमध्ये सकाळपासून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग सुरू होता. सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, निंबज नगरसह येरवड्यातील शांतीनगर, आदर्शनगर इथंही पाण्याची पातळी वाढल्यानं अग्निशमन दलानं या भागातील अनेक नागरिकांची सुखरूप सुटका केली. तसंच या परिसरात लष्कराची तुकडीही तैनात करण्यात आली होती. पुण्यात होत...

August 4, 2024 1:46 PM August 4, 2024 1:46 PM

views 13

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता

भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसंच पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य राजस्थान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या महिन्याच्या १० तारखेपर्यंत जम्मू-काश्मीर आणि पंजाब, तसंच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातह...

August 4, 2024 9:56 AM August 4, 2024 9:56 AM

views 16

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात संततधार पावसामुळं धरणं भरली, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्यानं कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत आणि सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आणि त्यांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित ...