December 28, 2025 8:13 PM December 28, 2025 8:13 PM

views 2

गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट

गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये येत्या ३१ तारखेपर्यंत दाट ते अतिदाट धुकं राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगालचा हिमालयाजवळचा भाग आणि इशान्य भारतात उद्या दाट धुकं राहण्याची शक्यता आहे...

July 16, 2025 2:44 PM July 16, 2025 2:44 PM

views 8

येत्या दोन ते तीन दिवसांत ठिकठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन ते तीन दिवसांत राजस्थान, झारखंड, बिहार, ओदिशा आणि मध्य भारत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण बिहार आणि झारखंडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.   हवामान विभागानं उद्यापर्यंत तामिळनाडू, आंध्र प्रदेश किनारी, यानम आणि रायलसीमाच्या काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.

June 27, 2025 4:20 PM June 27, 2025 4:20 PM

views 5

हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

येत्या चोवीस तासांसाठी हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मिळाला असून लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना आहेत. वर्धा जिल्ह्यात दिगडोह इथं पूर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यात मुसळधार पावसामुळे समृद्धी महामार्गावर पुलाखाली पाणी साचल्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला.

June 19, 2025 2:44 PM June 19, 2025 2:44 PM

views 17

मुंबईसह कोकणातल्या सागरी किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याचा हवामान विभागाचा इशारा

मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरी किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळतील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. यावेळी लहान बोटींनी समुद्रात जाऊ नये, तसंच किनारपट्टी जवळ पर्यटन आणि जलक्रीडा पूर्णपणे थांबवाव्यात असे निर्देश राज्य आपत्कालीन केंद्रानं दिले आहेत.    पालघर पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि साताऱ्याच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, पुणे,...

June 17, 2025 8:04 PM June 17, 2025 8:04 PM

views 23

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा

सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम बंगाल, ओदिशा, बिहार, झारखंड आणि देशाच्या अन्य भागात उद्यापर्यंत जोरदार ते अती जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर  बिहार, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात आज विजांच्या लखलखाटासह वादळी वारे वाहतील असा अंदाज आहे.    येत्या शुक्रवारपर्यंत दिल्लीसह हरियाणा, पंजाब, आणि उत्तरप्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

June 16, 2025 1:38 PM June 16, 2025 1:38 PM

views 14

पश्चिम किनारपट्टीत मुसळधार पावसाचा इशारा

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि गुजरातमध्ये पुढील दोन दिवस जोरदार वारे आणि पाऊस पडेल. वायव्येकडची राज्यं आणि दिल्लीत काल तापमान कमी झालं. मान्सून अद्याप पुढे सरकला  नसला तरी कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारीभागात जोरदार पाऊस पडत आहे.अशी माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक आर के ज्ञानमणी यांनी आकाशवाणीला दिली.

May 22, 2025 3:29 PM May 22, 2025 3:29 PM

views 16

दक्षिण कोकणाला पावसाचा रेड अलर्ट

दक्षिण कोकण किनारपट्टी जवळ अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, हवामान विभागानं दक्षिण कोकण किनारपट्टी भागाला जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या २ ते ३ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असून, २७ मे च्या सुमाराला तो  पूर्व भारतात पोहोचेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.