December 1, 2025 1:42 PM December 1, 2025 1:42 PM
20
‘या’ भागात थंडीची लाट येणार…
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पंजाबमधे थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि तेलंगणामधे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधे विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे येईल, असं हवामान विभागाने कळवलं आहे. तर मणिपूर आणि ओदिशामधे दाट धुकं पसरण्याची शक्यता आहे.