August 1, 2024 8:36 PM August 1, 2024 8:36 PM

views 22

वायनाड दुर्घटनेतल्या बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी योग्य पावलं उचलली जातील – मुख्यमंत्री पिनरायी विजयन

केरळमधे वायनाड जिल्ह्यातल्या मुंडक्काई इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी पावलं उचलली जातील असं, मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी सांगितलं. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.  अडकून पडलेल्या अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती विजयन यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. आणखी बरेच लोक बेपत्ता आहेत, तसंच मलब्याखाली मृतदेह दबलेले असण्याची शक्यता ...

July 31, 2024 8:06 PM July 31, 2024 8:06 PM

views 12

‘नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देऊनही केरळ सरकारनं प्रतिबंधात्मक उपाय केले नाही’

वायनाड दुर्घटनेविषयी आज राज्यसभेत चर्चा झाली. नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना केरळ सरकारला देऊनही त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय केले नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं. केरळमध्ये जोरदार पाऊस आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्याचं केरळ सरकारला २३, २४ आणि २५ जुलै रोजी कळवलं होतं, लोकांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, हेही सांगण्यात आलं होतं, मात्र केरळ सरकारनं लोकांना स्थलांतरित केलं नाही, असं शहा म्हणाले. गुजरात आणि ओदिशासारख्या राज्यांनी केंद्र सरकारनं दिलेला इशारा गां...

July 31, 2024 8:00 PM July 31, 2024 8:00 PM

views 9

केरळमधे वायनाड इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर

केरळमधे वायनाड जिल्ह्यात काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे, तर १९१ लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य आजही सुरू आहे. मुंडक्काई परिसरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून अनेक मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. काही मृतदेह चलियार नदीतून वाहत येत असून ते बाहेर काढण्यात येत आहेत. जखमी झालेल्या १८६ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.    चुरालमाला इथं तात्पुरता पूल उभारण्याचे लष्कराचे प्रयत्न,  सातत्यानं पडत असलेला जोरदार पाऊस आणि नदीच्या जोरदा...