October 23, 2024 8:32 PM October 23, 2024 8:32 PM

views 10

वायनाड मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांचा उमेदवारी अर्ज

केरळमधल्या वायनाड मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रियांका गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी त्या कलपेट्टा इथं आयोजित केलेल्या रोड शो मध्ये सहभागी झाल्या. वायनाडचा भाग होणं ही आपल्यासाठी आनंद आणि सन्मानाची बाब असल्याचं यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्य...