May 2, 2025 9:16 PM May 2, 2025 9:16 PM
107
WAVES 2025 : वेव्हज बाजाराचा पहिल्या दीड दिवसात २५४ कोटी रुपयांचा व्यवसाय
वेव्हज परिषदेत वेव्हज् बाजारने पहिल्या दीड दिवसात चित्रपट, संगीत, ऍनिमेशन, व्हीएफएक्स आदी क्षेत्रात २५४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पुढल्या दोन दिवसात यात आणखी भर पडेल, असं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. वेव्हज बाजारमधल्या खिडकी गाँव या प्रकल्पाने एशियन सिनेमा फंडशी व्हीएफएक्स करार केला. या प्रकल्पाचं मूल्य दोन कोटी रुपये आहे. जागतिक प्रेक्षकांसाठी कंटेट निर्मिती करण्याच्या उद्देशानं सध्या ओएमएल आणि गॅझप्रॉम मीडिया यांच्यात करार होणार आहे....