February 25, 2025 1:55 PM February 25, 2025 1:55 PM

views 13

वेव्हजमध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमधे पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात भारतीय सिनेमांचे पोस्टर्स स्पर्धकांना बनवायचे आहेत. या स्पर्धेसाठी आतापर्यंत २९६ जणांनी नोंदणी केली आहे. यात स्पर्धकांना हाताने तसंच डिजिटल साधनांचा वापर करून पोस्टर्स बनवता येतील.    वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत १ ते ४ मे या कालावधीत होणार आह. जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या समिटचं उद्दिष्ट आहे. 

February 19, 2025 9:01 PM February 19, 2025 9:01 PM

views 13

WAVES: इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडियो व्हिझ्युअल अँड एंटरटेनमेंट समिटमधे ईडीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे. यात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकमधील जागतिक प्रतिभा एकत्र आणल्या जातील. संगीताची निर्मिती आणि लाईव्ह परफॉर्मन्समधे नाविन्यपूर्णता, सर्जनशीलता आणणं हा याचा हेतू आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहाय्याने भारतीय संगीत उद्योगानं याचं आयोजन केलं आहे. हा उपक्रम क्रिएट इन इंडियाचा भाग आहे. प्रसारण आणि इन्फोटेनमेंट, डिजिटल माध्यमं आणि नवोन्मेष, चित्रपट आणि A...

February 18, 2025 8:23 PM February 18, 2025 8:23 PM

views 7

WAVES अंतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणी सुरू

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अंतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. व्हिडीओ पद्धतीचे आशय तयार करणारे किंवा संकलन विषयात आवड असणारे विद्यार्थी तसंच चित्रपट निर्माते या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. यासाठी त्यांना नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमाच्या व्हिडीओ संग्रहालयाचा वापर करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्जदारांचं वय किमान १८ वर्षं असणं आवश्यक आहे. ३१ मार्च ही नोंदणीची शेवटची तारीख असून वेव्हजचा कार्यक्रम येत्या १...

February 11, 2025 7:35 PM February 11, 2025 7:35 PM

views 9

‘वेव्ह्ज २०२५’ परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेच्या धर्तीवर वेव्ह्ज २०२५ ही परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह इतरांशी मुंबईत मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी राज्य शासनाकडून आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

February 10, 2025 7:54 PM February 10, 2025 7:54 PM

views 10

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे वेव्हज २०२५ परिषदेचं आयोजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे World Audio Visual & Entertainment Summit, वेव्हज २०२५ परिषद आयोजित करण्यात येणार आहे. शहरी जीवनावर आधारित गेम आविष्कारांसाठी सिटी क्वेस्ट शेड्स ऑफ भारत हे दालन त्यात असेल. आपापल्या शहरात शाश्वत विकास उद्दिष्टांकडे प्रवासाचं प्रतिबिंब आपल्या कलाकृतीत उमटवण्याची संधी  दालनात मिळेल. देशातल्या ५६ शहरांचा समावेश या संकल्पनेत  आहे. येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज कार्यक्रमात या दालनात उत्कृष्ट ठरणाऱ्या कलाकृतींचा गौरव करण्यात येईल.