March 5, 2025 7:14 PM March 5, 2025 7:14 PM

views 14

WAVES 2025: अंतर्गत बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंज स्पर्धेचा समावेश

क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग असलेल्या वेव्हज इंडिया अंतर्गत बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंज स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत भारतातल्या विविध ठिकाणांचं हवाई चित्रीकरण करण्याचं आव्हान ठेवण्या आलं आहे. स्पर्धकांना भारताचा वास्तूवारसा, भौगोलिक सौंदर्य तसंच जीवनमानाचं हवाई चित्रीकरण केलेला २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ तयार करायचा आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि  ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने संयुक्तरित्या या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हा उपक्रम १ ते ४ मे २०२५ दरम्यान म...

March 4, 2025 8:36 PM March 4, 2025 8:36 PM

views 13

WAVES 2025: कलाकारांनी आपली आवड जपावी-जजेल होमावजीर

व्हेव्ज शिखर परिषदेत आयोजित  केलेल्या  कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेत सर्जनशीलतेला मोठा वाव  आहे, असं या स्पर्धेत उपांत्य फेरीतले विजेते निवडण्यासाठी नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय ज्युरींपैकी एक असलेल्या जजेल होमावजीर यांनी सांगितलं. भारतात कॉमिक्सची बाजारपेठ किंवा वितरण प्रणाली नाही, या स्पर्धेमुळे कलाकारांना आपली कला बाजारपेठेत नेण्याची संधी निर्माण होईल, असं होमावजीर म्हणाले. या स्पर्धेसाठी फँटसी, साय फाय, भावनिक असे विविध विषय प्राप्त झाले आहेत, असं त्यांनी सांगितलं. कलाकारांनी आपली आवड जपावी असं आ...

March 4, 2025 6:04 PM March 4, 2025 6:04 PM

views 2

WAVES 2025: ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी बेंगळुरूत मार्गदर्शपर कार्यशाळेचं आयोजन

वेव्ज २०२५ कार्यक्रमांतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी बेंगळुरू इथे मार्गदर्शपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन सीबीएफसी आणि नेटफ्लिक्स यांनी संयुक्तपणे केलं होतं. या कार्यशाळेचा उद्देश तरुण निर्मात्यांना या क्षेत्राविषयी अधिक माहिती मिळावी हा होता. या कार्यशाळेत ॲनिमेशन, फिल्म मेकिंग, गेमिंग आणि कॉमिक्स विषयातल्या साठहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

March 3, 2025 7:05 PM March 3, 2025 7:05 PM

views 21

व्हेवज शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टरक्लासचं आयोजन

व्हेवज शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टरक्लासचं आयोजन करण्यात आलं आहे. ऍनिमेशन फिल्म मेकर्स कॉम्पिटेशन स्पर्धेच्या विजेत्यांना यात मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.   यात उद्या गुनीत मोंगा यांचं, ५ मार्च रोजी अर्नी ओले लोपेज, ६ मार्च रोजी अनुसिंह चौधरी हे मार्गदर्शन करतील. मास्टरक्लासमधे शोबू यार्ला गड्डा यांनी आज मार्गदर्शन केलं.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या कार्यक्रमाचा हा उपक्रम १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.

March 3, 2025 6:53 PM March 3, 2025 6:53 PM

views 11

वेव्हजमध्ये बॅटल ऑफ बँड्स स्पर्धेचं आयोजन

वेव्ज समिट २०२५ अंतर्गत संगीत क्षेत्रासाठी बॅटल ऑफ बँड्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रसार भारती आणि सारेगामा यांनी संयुक्तरित्या या स्पर्धेचं आयोजन केलं असून त्यात विविध बँड्सना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

March 2, 2025 7:35 PM March 2, 2025 7:35 PM

views 13

WAVES 2025: अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवरची इंदूर इथं चर्चासत्रं झाली

वेव्ज समिट २०२५ अंतर्गत सुरू होणाऱ्या एक्स आर क्रिएटर हॅकेथॉनच्या संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवारी इंदूर इथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वेव्ज अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवरची चर्चासत्रं झाली, त्यात विविध तज्ञांनी सहभाग घेतला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या कार्यक्रमाचा हा प्रमुख उपक्रम असून तो १  ते ४  मे दरम्यान मुंबईत होणार आहे. 

March 1, 2025 7:08 PM March 1, 2025 7:08 PM

views 13

वेव्हजमध्ये कम्युनिटी रेडिओ कंटेट स्पर्धेचं आयोजन

वेव्हज परिषदेत कम्युनिटी रेडिओ कंटेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून प्रसारित होणाऱ्या नावीन्यपूर्ण, सर्जनशील कार्यक्रमांचं महत्व अधोरेखित करणं, प्रादेशिक वैशिष्ट्य आणि स्थानिक कलाकारांना सक्षम करणं हा याचा हेतू आहे. ही परिषद १ ते ४ मे रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

February 28, 2025 7:31 PM February 28, 2025 7:31 PM

views 10

वेव्हजमध्ये YouTube Shortsद्वारे भारताबाबतचा दृष्टिकोन दाखवण्याची संधी

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲंड एंटरटेनमेंट संमेलन वेव्हज एक्सप्लोरर चॅलेंजच्या माध्यमातून कथाकार आणि रचनाकारांना युट्यूब शॉर्ट्स तयार करून आपला भारताबाबतचा दृष्टिकोन जगासमोर मांडण्याची संधी देत आहे. या शॉर्ट्सद्वारे ते भारताची विविधता, प्रामाणिकपणा आणि प्रतिभा टिपू शकतात. शॉर्ट्सचा आशय रचनाकाराचा स्वतःचा असणं आवश्यक आहे. व्लॉगसाठी तयार केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त ७ मिनिटांचा, तर शॉर्ट्स जास्तीतजास्त १ मिनिटाचा असावा.    माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्हज या कार्यक्रमाचा हा प...

February 26, 2025 2:20 PM February 26, 2025 2:20 PM

views 14

वेव्हजमध्ये ट्रेलर मेकिंग स्पर्धेचं आयोजन

मुंबईत होऊ घातलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमधे ट्रेलर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्हिडिओ संपादन, चित्रपट निर्मिती याची आवड असणाऱ्यांसाठी ही स्पर्धा  आहे. यात कमीत कमी अठरा वर्षं वयाचे स्पर्धक भाग घेऊ शकतात. ट्रेलर पाठवण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे.    वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत १ ते ४ मे या कालावधीत होणार आह. जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या समिटचं उद्दिष्ट आहे.

February 25, 2025 3:20 PM February 25, 2025 3:20 PM

views 6

वेव्हजमध्ये कॉमिक क्रॉनिकल्स स्पर्धेचं आयोजन

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमधे कॉमिक क्रॉनिकल्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्पर्धकांना कॉमिक्स म्हणजे चित्रकथा बनवायच्या आहेत. या स्पर्धेसाठी आतापर्यंत ७७४ जणांनी नोंदणी केली आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत १ ते ४ मे या कालावधीत होणार आहे. जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या समिटचं उद्दिष्ट आहे.