March 13, 2025 9:14 PM March 13, 2025 9:14 PM

views 21

WAVES 2025: मुंबईत होणाऱ्या परिषदेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार

सिनेमा, आशय क्रांती, डिजिटल जग, माहिती तंत्रज्ञान उद्योग यांचं एकत्रीकरण वेव्ह अर्थात World Audio Visual and Entertainment Summit मधून प्रतिबिंबित होत असल्याचे गौरवोद्गार परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काढले आहेत. वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक पातळीवर माध्यम आणि मनोरंजन उद्योगातल्या भारताच्या योगदानाचा आढावा त्यांनी घेतला.    देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नव्या पिढीच्या content creat...

March 13, 2025 12:39 PM March 13, 2025 12:39 PM

views 14

WAVES 2025 : नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी विशेष कार्यक्रम

वेव्ह्ज अर्थात वर्ल्ड ऑडियो व्हिज्यूअल ॲण्ड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्हज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाईल.   जगभरातल्या १०० हून अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत यासाठी आमंत्रित आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री ...

March 12, 2025 1:28 PM March 12, 2025 1:28 PM

views 11

वेव्हजमध्ये सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धेचं आयोजन

क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत होणाऱ्या वेव्हज २०२५ परिषदेत सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ११२ संगीतकारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८० शास्त्रीय संगीतकार तसंच लोककलाकारांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्देश विविध शैलींच्या संगीताला एकाच छताखाली आणून सादर करणं असा आहे. दूरदर्शन आणि महावीर जैन फिल्म्स यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाची अंतिम फेरी १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.

March 11, 2025 3:52 PM March 11, 2025 3:52 PM

views 9

वेव्हज परिषदेत ॲनिमेशनपट बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन

क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत वेव्हज परिषदेत ॲनिमेशनपट बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स तसंच एक्सटेंडेड रियालिटी असे घटक यात समाविष्ट असतील. जगभरातल्या ॲनिमेशनपट निर्मात्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून आतापर्यंत १ हजार २९० अर्ज दाखल झाले आहेत. यात १९ आंतरराष्ट्रीय निर्मात्यांचा समावेश आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.

March 10, 2025 5:28 PM March 10, 2025 5:28 PM

views 10

वेव्हज अंतर्गत अँटी पायरसी चॅलेंज स्पर्धा ठेवण्यात आली

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या वेव्हज अंतर्गत अँटी पायरसी चॅलेंज स्पर्धा ठेवण्यात आली आहे. आजच्या डिजिटल युगात दृक्श्राव्य आशयात होणारी फेरफार तसंच अनधिकृत प्रसारण रोखण्यासाठीची आव्हानं वाढत आहेत. या पायरसीला रोखण्यासाठी फिंगरप्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कॉन्फेरडेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचा उद्देश डिजिटल माध्यमावर प्रस...

March 9, 2025 2:50 PM March 9, 2025 2:50 PM

views 11

वेव्हजमध्ये ऍनिमेशन स्पर्धेचं आयोजन

मुंबईत होऊ घातलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं ऍनिमेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतातील ऍनिमेशन क्षेत्राला चालना देण्यासह मांगा, वेबटून आणि ऍनिमेशन या शैलींमधल्या भारतीय प्रतिभेला जगासमोर आणणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या क्षेत्रातले विद्यार्थी, तसंच नवे आणि अनुभवी व्यावसायिक तज्ञ, वैय्यक्तिक आणि संघिक स्वरुपात या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहितीकरता आपण वेव्हज् इंडिया डॉट ओआरजी या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

March 9, 2025 1:06 PM March 9, 2025 1:06 PM

views 10

वेव्हजमध्ये ट्रुथ टेल हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे वेव्हजमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत ट्रुथ टेल हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याचा उद्देश, थेट प्रक्षेपणामध्ये दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय विकसित करणं असा आहे.

March 8, 2025 8:53 PM March 8, 2025 8:53 PM

views 10

WAVES 2025 : परिषदेच्या आयोजनाबाबत उद्योग विभागातर्फे मुंबईत बैठकीचं आयोजन

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने येत्या मे महिन्यात मुंबईत जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजनाच्या वेव्हज या शिखर परिषदेचं आयोजन होणार आहे. या परिषदेच्या आयोजनाबाबत उद्योग विभागातर्फे मुंबईत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.   येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या परिषदेत चित्रपट, टीव्ही, ब्रॉडकास्ट, प्रिंट, रेडिओ, वृत्तपत्रं, नवीन मीडिया, जाहिरात...

March 7, 2025 1:37 PM March 7, 2025 1:37 PM

views 17

वेव्हजमध्ये ‘रिझोनेटः द ईडीएम चॅलेंज’ या स्पर्धेचं आयोजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतीय संगीत उद्योगाच्या सहकार्याने ‘रिझोनेटः द ईडीएम चॅलेंज’ या स्पर्धेचं आयोजन करत आहे. दृक-श्राव्य आणि मनोरंजन विश्वात सृजनशील प्रतिभेला आणि नवोन्मेषाला वाव देणाऱ्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग म्हणून जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद - वेव्हज २०२५ मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. ही स्पर्धा कोणत्याही देशातील इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकची रचना आणि निर्मितीचा पूर्वानुभव असलेले कलाकार, संगीत रचनाकार, संगीतकार आणि सादरकर्ते यांच्यासाठी आहे. या संगीतमय स्...

March 6, 2025 3:02 PM March 6, 2025 3:02 PM

views 10

WAVES 2025 : मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ‘व्हेवज बाजार’ व्यासपीठ उपलब्ध

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या व्हेवज इंडिया २०२५ या कार्यक्रमांतर्गत मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी व्हेवज बाजार हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत चित्रपट, टीव्ही, ॲनिमेशन, गेमिंग, जाहिरात, संगीत दिग्दर्शन, रेडिओ यांसह माध्यमांच्या विविध प्रकारांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जाहिरात किंवा चित्रपटांचे निर्माते, गेम डेव्हलपर आदींसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळू शकणार आहे.