April 1, 2025 7:24 PM April 1, 2025 7:24 PM
16
वेव्हजमध्ये ८५ हजार स्पर्धकांची नोंदणी
वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचा एक भाग असलेल्या क्रिएट इन इंडियाच्या पहिल्या पर्वात ८५ हजारांच्या नोंदणीचा टप्पा गाठला आहे. यात ११०० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या ३२ प्रकारांसाठी घेण्यात आलेल्या फेऱ्यांमधून ७५०हून अधिक स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. या परिषदेची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.