April 27, 2025 10:17 AM April 27, 2025 10:17 AM

views 12

मुंबईत १ ते ४ दरम्यान ‘वेव्हज’ परिषदेचं आयोजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह्ज या शिखर परिषदेचं आयोजन मुंबईत 1 ते 4 मे या कालावधीत करण्यात आलं आहे. यामध्ये देशाचा कथाकथनाचा वारसा आणि जागतिक प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात त्याच्या वाढत्या प्रभावाचं प्रदर्शन घडवण्यात येणार आहे. संमेलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रुती, कृती आणि दृष्टी या पद्धती पर्यटकांना भारतीय कथापरंपरेचा परिचय करून देतील. कला टू कोड या संकल्पनेवर आधारित वसुधैव कुटुंबकम कार्यक्रमात देशाची कलात्मक परंपरा, दीर्घकाळापासूनची सर्जनशीलता, सौहार्द आणि सांस्कृतिक मुत्स...

April 26, 2025 8:32 PM April 26, 2025 8:32 PM

views 14

waves 2025: इंडिया -अ बर्ड्स आय व्ह्यू स्पर्धेचं आयोजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह‌्‍ज या उपक्रमांतर्गत इंडिया -अ बर्ड्स आय व्ह्यू स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातल्या स्पर्धकांना भारताचं सौंदर्य, भौगोलिक दृश्यं, नवोक्रम, वारसा, संस्कृती तसंच, प्रगती आणि परिवर्तन अधोरेखित करणारे २ ते ३ मिनिटांचे व्हिडीओ सादर करण्याच आव्हान देण्यात आलं होतं. या स्पर्धेत १ हजार ३२४ स्पर्धकांनी नोंदणी केली होती. कठोर मूल्यांकन प्रक्रियेनंतर, प्रत्येक श्रेणीतल्या पाच अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली. हे स्पर्धक येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या व...

April 23, 2025 9:57 AM April 23, 2025 9:57 AM

views 51

वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत पेव्हिलियनचं उद्घाटन होणार

मुंबईत वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत पेव्हिलियनचं उद्घाटन होणार आहे. भारत पॅव्हेलियनच्या श्रुती, कृर्ती, दृष्टी आणि सर्जकाची कल्पकता या चार भागांमधून प्रेक्षकांना भारताच्या कथाकथनाच्या परंपरेचं दर्शन घडेल. श्रुतीमध्ये कथाकथनाची मौखिक परंपरा, कृतीमध्ये लेखन परंपरा, दृष्टीमध्ये दृश्य माध्यमांचा विस्तार आणि सर्जकाची कल्पकता यातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यातील कथाकथन यांचा समावेश आहे. हे पॅव्हेलियन जगाच्या कथाकथनाच्या परंपरेला आकार देण्यातल्या भारताच्या योगदानाबाबतचा संग्रह असे...

April 18, 2025 8:25 PM April 18, 2025 8:25 PM

views 11

WAVES Create in India Challenge ची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू झालेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथं होणार आहे. यात १ लाख आशय निर्मात्यांनी नोंदणी केली असून त्यात १ हजार १०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे. अ‍ॅनिमेशन, कॉमिक्स, एआय, एक्सआर, गेमिंग, संगीत, व्हिडीओ अशा विविध क्षेत्रातल्या या स्पर्धकांना आपलं कौशल्य आजमावण्याची संधी यात मिळणार आहे. अंतिम फेरीत विजयी ठरलेल्यांना दुसऱ्या दिवशी वेव...

April 18, 2025 8:34 PM April 18, 2025 8:34 PM

views 9

राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी वेव्हज परिषद तयारीचा आढावा घेतला

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज परिषदेच्या तयारीचा आज आढावा घेतला. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ वर्ल्ड सेंटरचा विस्तृत दौरा केल्यानंतर त्यांनी या संदर्भात सहभागी असलेल्या विविध विभागांच्या प्रमुखांची एक बैठकही घेतली.

April 15, 2025 8:54 PM April 15, 2025 8:54 PM

views 13

WAVES 2025 : बंगळुरात ॲनिमेशन, कॉमिक्स आणि डिजिटल व्हर्टिकल स्टोरीटेलिंग स्पर्धा

क्रिएट इन इंडिया अंतर्गत होणाऱ्या वेव्हजचा भाग म्हणून ॲनिमेशन, कॉमिक्स आणि डिजिटल व्हर्टिकल स्टोरीटेलिंग स्पर्धा आज बंगळुरू झाली. यात जपानी शैलीतलं ॲनिमेशन, कॉमिक्स, वेबटून्स, कॉश्चूम परफॉर्मन्स आणि व्हॉईस ॲक्टिंग असे पाच प्रकार होते. या स्पर्धेत १२१हून अधिक स्पर्धकांनी पात्रता फेरीसाठी नोंदणी केली आहे. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या स्पर्धकांना मुंबईत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेतल्या विजेत्यांना टोकियो इथे होणाऱ्या ॲनिमे जपान २०२६ या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

April 12, 2025 8:28 PM April 12, 2025 8:28 PM

views 6

हैदराबादमधे वेव्हज ऍनिम आणि मांगा स्पर्धेत हजारो स्पर्धकांचा सहभाग

हैदराबादमधे आज झालेल्या वेव्हज ऍनिम आणि मांगा स्पर्धेत हजारो स्पर्धक आणि संस्थांनी सहभाग नोंदवला.  ऍनिम, मांगा, वेबटून्स, कॉस्प्ले यासारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेचा हेतू आहे. ऍनिम आणि मांगा क्षेत्रात पुढच्या पिढीला ओळख मिळवून देण्यासाठीचं हे व्यासपीठ आहे, असं मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव अंकुर भसीन यांनी सांगितलं. याआधी ही स्पर्धा मुंबई, नागपूर, गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, दिल्ली, वाराणसी, अहमदाबाद आणि चेन्नई इथं झाली आहे. या स्पर्धेच्या विजे...

April 11, 2025 8:27 PM April 11, 2025 8:27 PM

views 13

WAVES 2025 : बंगळुरू इथं VFX स्पर्धेची अंतिम फेरी

वेव्हजची राष्ट्रीय स्तरावरची दक्षिण विभागाच्या व्ही एफ एक्स स्पर्धेची अंतिम फेरी आज बंगळुरू इथं पार पडली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जैन विद्यापीठ आणि अभय फाऊंडेशन यांच्या सहयोगानं ही स्पर्धा आयोजित केली होती. या फेरीसाठी १ हजाराहून अधिक स्पर्धकांमधून १४ जणांची निवड करण्यात आली होती. आजच्या विभागीय अंतिम फेरीच्या विजेत्याला मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या अंतिम फेरीसाठी पाठवलं जाणार आहे, अशी माहिती अभय फाऊंडेशनचे सचिव आर. के. चंद  यांनी दिली. 

April 11, 2025 8:32 PM April 11, 2025 8:32 PM

views 17

वेव्हज परिषद दरवर्षी मुंबईतच होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वेव्ह्ज परिषद दर वर्षी भरवण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून तिचं आयोजन मुंबईतच होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह वेव्ह्जच्या तयारीचा त्यांनी आज आढावा घेतला. अशा प्रकारची जगातली सर्वात मोठी परिषद असून जगभरातल्या १०० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्याबद्दलचा सामंजस्य करार राज्य आणि कें...

April 11, 2025 3:47 PM April 11, 2025 3:47 PM

views 8

अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र आणि मुंबईचं स्थान अतिशय महत्त्वाचं – अश्विनी वैष्णव

सृजनशील क्षेत्रातून उभ्या राहणाऱ्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र आणि मुंबईचं स्थान अतिशय महत्त्वाचं असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या या काळात हे स्थान अबाधित राखण्याच्या उद्देशानं वेव्ह्ज २०२५चं आयोजन मुंबईत होणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वेव्ह्जच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.   वेव्ह्ज ही या क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी परिषद असून जगभरातल्या १०० पेक्षा जास्त देशांचे प...