May 2, 2025 7:32 PM May 2, 2025 7:32 PM

views 19

वेव्हज परिषदेत ‘रेडिओ रिइमॅजीन्ड’ विषयावर चर्चासत्र

वेव्हज् परिषदेत आज रेडिओ रिइमॅजीन्ड या विषयावर चर्चासत्र झालं. नभोवाणी हे खरोर लोककल्याणासाठी काम करणारं माध्यम असून भारत ही नभोवाणीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, असं प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेम्पट्टी यावेळी म्हणाले. समाजाच्या विविध स्तरातले श्रोते नभोवाणीला लाभले आहेत, असंही ते म्हणाले.  

May 1, 2025 7:18 PM May 1, 2025 7:18 PM

views 10

पहिल्या जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं मुंबईत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशात सध्या ऑरेंज इकॉनॉमी अर्थात सर्जनकेंद्रीत अर्थव्यवस्थेचा उदय होतो आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर इथे सुरू असलेल्या वेव्हज् अर्थात जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यात आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत असं ते म्हणाले.    तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना जगात मानवी संवेदना जागृत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची त्यांनी व्यक्त केली. हजारो वर्षं गीत, संगीत, ...

May 1, 2025 1:42 PM May 1, 2025 1:42 PM

views 13

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘वेव्हज’ परिषदेचं उद्घाटन

वेव्हज् हा फक्त एका परिषदेचं संक्षिप्त नाव नाही, तर खरोखर एक सांस्कृतिकतेची, सर्जनशीलतेची, जागतिक स्तरावर परस्परसंबंधांची लाट आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर इथे सुरू असलेल्या वेव्हज् अर्थात जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.    वेव्हज् हे एक असं जागतिक व्यासपीठ आहे. जे तुमच्यासारख्या प्रत्येक कलाकाराचं आहे. त्यामुळे प्रत्येक कलावंत सर्जनशीलतेच्या जगाशी जोडला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले. यावे...

April 30, 2025 4:32 PM April 30, 2025 4:32 PM

views 21

पहिली जागतिक WAVES summit India उद्यापासून मुंबईत

पहिली जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन आणि दृक्‌श्राव्य उद्योगाच्या भविष्याला एक जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. या परिषदेत मनोरंजन क्षेत्रातली आघाडीची व्यक्तिमत्त्वं, विविध माध्यम समूहांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी यांच्यासह जगभरातले सर्जनशील विचारसरणीचे आशय निर्माते सहभागी होणार आहेत. त्याशिवाय शंभर देशांमधले सुमारे ५ हजार प्रतिनिधी देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत....

April 29, 2025 10:12 AM April 29, 2025 10:12 AM

views 7

1 मे या दिवशी वेव्स ऑफ इंडिया अल्बमचं अनावरण

मुंबईत होणाऱ्या वेव्स 2025 या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 1 मे या दिवशी वेव्स ऑफ इंडिया या अल्बमचं अनावरण करण्यात येणार आहे. या अल्बममध्ये 5 गाणी असून त्यांची रचना ऑस्कर विजेत्या गीतकार एम. एम. किरवाणी यांनी केलेली आहे. संगीत अकादमी पुरस्कारप्राप्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी सत्यम शिवम् सुंदरम या गीताला संगीत दिल आहे.   गीतकार प्रसून जोशी आणि गायक संगीतकार शंकर महादेवन यांनी ऊंचा आसमान हे गीत तयार केलं आहे. 3 वेळा ग्रामी पुरस्कार प्राप्त गायक रिकी केज यांनी सिंफनी ऑफ इंडिया हे गीत तर देसी...

April 29, 2025 9:58 AM April 29, 2025 9:58 AM

views 15

१ मे ते ४ मे दरम्यान मुंबईत वेव्ज बैठकीचं आयोजन

मुंबईत येत्या १ मे ते ४ मे दरम्यान वेव्ज अर्थात ‘विश्व दृकश्राव्य मनोरंजन शिखर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडं आहे.   मुंबईमध्ये होणाऱ्या वेव्हज २०२५ या शिखर परिषदेचं आयोजन महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, नागरिकांनी या परिषदेतील दालनांना भेट द्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जागतिक स्तरा...

April 28, 2025 9:31 PM April 28, 2025 9:31 PM

views 14

वेव्हज परिषदेचा देशातल्या तरुणांना लाभ – मंत्री डॉ. एल. मुरुगन

वेव्ह्ज २०२५ परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी एका लेखाद्वारे केलं आहे. वेव्ह्जच्या केंद्रस्थानी आजची तरुणाईच असून कौशल्यविकास, स्वयंउद्योजकता आणि जागतिक सहकार्य क्षेत्रातल्या नव्या वाटा यामुळे खुल्या होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   देशातला माध्यम आणि मनोरंजन उद्योग आज अडीच ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त असून सर्जनशीलता, नवोन्मेष आणि स्वयंउद्योजकता क्षेत्रात जगाचं नेतृत्व करायचं भारताचं ध्येय वेव्ह्ज २०२५ मधू...

April 28, 2025 8:50 PM April 28, 2025 8:50 PM

views 28

वेव्हज २०२५ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबईत येत्या १ मे पासून ४ मे पर्यंत आयोजित वेव्ह्ज, अर्थात जागतिक दृक् श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन १ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधले परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. हिंदी, मराठी, तामीळ चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार आणि निर्माते कार्यक्रमात सहभ...

April 28, 2025 7:22 PM April 28, 2025 7:22 PM

views 20

WAVES 2025 : ऍनिमेशन फिल्ममेकर्स कॉम्पिटिशन (AFC) स्पर्धेत ४२ स्पर्धकांची निवड

वेव्ह्ज दरम्यान आयोजित केलेल्या विविध स्पर्धांची अंतिम फेरीही याचवेळी होणार आहे. ॲनिमेशन, VFX, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्चुअल रियालिटी अशा विविध विभागांमधून ४२ स्पर्धक निवडले गेले आहेत. यात १२ फिचर फिल्म, १८ लघुपट, ९ टीव्ही मालिका तसंच ३ अन्य प्रकारच्या आशय प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्वांचं सादरीकरण या परिषदेत होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या तेजस जनार्दन या स्पर्धकानं सांगितलं..

April 28, 2025 9:31 PM April 28, 2025 9:31 PM

views 20

वेव्हज परिषदेत ‘वेव्हज ऑफ इंडिया’ या अल्बमचं प्रकाशन होणार

वेव्ह्ज २०२५, अर्थात पहिल्यावहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेनमेंट समिटच्या पहिल्या दिवशी ‘वेव्ह्ज ऑफ इंडिया’ या विशेष अल्बमचं प्रकाशन होणार आहे.  या अल्बममध्ये एकंदर पाच गाणी असतील. प्रख्यात संगीतकार एम. एम. कीरवाणी, ए. आर. रहमान, गायक-संगीतकार शंकर महादेवन आणि गीतकार प्रसून जोशी ही जोडी, संगीतकार रिकी केज आणि मीत ब्रदर्स असे, पाच वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीचे कलाकार यासाठी एकत्र आले आहेत.