May 3, 2025 6:29 PM May 3, 2025 6:29 PM

views 10

वेव्हज् बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती- संजय जाजू

वेव्ह्ज बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी वेव्ह्ज बाजारनं महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं त्यांनी सांगितलं.   या क्षेत्रातले व्यावसायिक संपर्क, सहयोग आणि नवनवीन व्यवसाय संधी शोधण्यासाठी एकत्र येण्याच्या उद्देशाने हा समर्पित मंच ठरल्याचं जाजू यांनी म्हटलं आहे. उच्च श्रेणीतल्या कंपन्या वेव्ह्ज बाजारमध्ये सहभागी होत असल्याचं...

May 1, 2025 7:18 PM May 1, 2025 7:18 PM

views 10

पहिल्या जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं मुंबईत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशात सध्या ऑरेंज इकॉनॉमी अर्थात सर्जनकेंद्रीत अर्थव्यवस्थेचा उदय होतो आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर इथे सुरू असलेल्या वेव्हज् अर्थात जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यात आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत असं ते म्हणाले.    तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना जगात मानवी संवेदना जागृत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची त्यांनी व्यक्त केली. हजारो वर्षं गीत, संगीत, ...

April 29, 2025 10:12 AM April 29, 2025 10:12 AM

views 7

1 मे या दिवशी वेव्स ऑफ इंडिया अल्बमचं अनावरण

मुंबईत होणाऱ्या वेव्स 2025 या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 1 मे या दिवशी वेव्स ऑफ इंडिया या अल्बमचं अनावरण करण्यात येणार आहे. या अल्बममध्ये 5 गाणी असून त्यांची रचना ऑस्कर विजेत्या गीतकार एम. एम. किरवाणी यांनी केलेली आहे. संगीत अकादमी पुरस्कारप्राप्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी सत्यम शिवम् सुंदरम या गीताला संगीत दिल आहे.   गीतकार प्रसून जोशी आणि गायक संगीतकार शंकर महादेवन यांनी ऊंचा आसमान हे गीत तयार केलं आहे. 3 वेळा ग्रामी पुरस्कार प्राप्त गायक रिकी केज यांनी सिंफनी ऑफ इंडिया हे गीत तर देसी...

April 12, 2025 7:16 PM April 12, 2025 7:16 PM

views 6

WAVES Resonate EDM Challenge: पहिल्या दहा उत्कृष्ट स्पर्धकांच्या नावांची घोषणा

वेव्हज परिषदेमधे क्रिएट इन इंडिया स्पर्धे अंतर्गत रेझोनेट द ईडीएम चॅलेंज स्पर्धेच्या पहिल्या दहा उत्कृष्ट स्पर्धकांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली. यात महाराष्ट्रातल्या श्रीकांत वेमुला, मयांक वाढानी, क्षितीज खोडवे, आदित्य दिलबागी, सुमित चक्रबोर्ती, मार्क सिमलीह, नोबज्योती बोरूआ, आसाममधल्या आदित्य उपाध्याय, दिब्यजित राय, आणि नवी दिल्लीतल्या देवांश रस्तोगी यांचा समावेश आहे. या स्पर्धकांना १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज परिषदेच्या ग्रँड फिनाले मध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करण्याची संधी म...

April 11, 2025 3:50 PM April 11, 2025 3:50 PM

views 16

मेक द वर्ल्ड वेअर खादी या स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांची घोषणा

वेव्हज २०२५ अंतर्गत खादीच्या वापराला उत्तेजन देण्याकरता नवकल्पना विकसित करण्यासाठी आयोजित केलेल्या मेक द वर्ल्ड वेअर खादी या स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.   त्याचबरोबर इनोव्हेट टू एज्यूकेट : हॅण्डहेल्ड डिवाईस डिझाईन चॅलेंज या स्पर्धेच्या दहा विजेत्यांची घोषणाही इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीने केली आहे. हे विजेते येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हजच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.

April 9, 2025 9:52 AM April 9, 2025 9:52 AM

views 9

वेव्हज उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘ट्रूथ टेल हॅकेथॉन’च्या पहिल्या ५ विजेत्यांची नावं जाहीर

वेव्हज उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘ट्रूथ टेल हॅकेथॉन’च्या पहिल्या ५ विजेत्यांची नावं जाहीर झाली आहेत. युनिकॉर्न, अल्केमिस्ट, व्हूशिंग लायर्स, बग स्मॅशर्स, आणि व्होर्टेक्स स्क्वाड या संघांना १० लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. चुकीची माहिती पसरु नये याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन उपाय शोधून काढल्याबद्दल हे सामायिक बक्षीस नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात देण्यात आलं. या स्पर्धेसाठी जगभरातून पाच हजार सहाशे प्रवेशिका आल्या होत्या. वेव्ज परिषद येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.

March 15, 2025 2:15 PM March 15, 2025 2:15 PM

views 18

वेव्हज् परिषद १ मे पासून मुंबई इथं सुरू

वेव्हज् अर्थात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद १ मे पासून मुंबई इथं सुरू होत आहे. विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी वेव्हज् उपलब्ध करून देणार आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेव्हजचं आयोजन करण्यात आलं आहे.

March 12, 2025 8:18 PM March 12, 2025 8:18 PM

views 14

वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन

वेव्हज अर्थात World Audio Visual and Entertainment परिषदेच्या पार्श्वभूमीवर उद्या नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्हज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाईल.   जगभरातल्या १०० हून अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत यासाठी आमंत्रित आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ...

March 11, 2025 3:52 PM March 11, 2025 3:52 PM

views 9

वेव्हज परिषदेत ॲनिमेशनपट बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन

क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत वेव्हज परिषदेत ॲनिमेशनपट बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स तसंच एक्सटेंडेड रियालिटी असे घटक यात समाविष्ट असतील. जगभरातल्या ॲनिमेशनपट निर्मात्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून आतापर्यंत १ हजार २९० अर्ज दाखल झाले आहेत. यात १९ आंतरराष्ट्रीय निर्मात्यांचा समावेश आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.

March 3, 2025 7:05 PM March 3, 2025 7:05 PM

views 21

व्हेवज शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टरक्लासचं आयोजन

व्हेवज शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टरक्लासचं आयोजन करण्यात आलं आहे. ऍनिमेशन फिल्म मेकर्स कॉम्पिटेशन स्पर्धेच्या विजेत्यांना यात मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.   यात उद्या गुनीत मोंगा यांचं, ५ मार्च रोजी अर्नी ओले लोपेज, ६ मार्च रोजी अनुसिंह चौधरी हे मार्गदर्शन करतील. मास्टरक्लासमधे शोबू यार्ला गड्डा यांनी आज मार्गदर्शन केलं.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या कार्यक्रमाचा हा उपक्रम १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.