December 13, 2025 3:09 PM December 13, 2025 3:09 PM

views 18

ठाण्यात पाणीटंंचाई, ५० टक्के पाणीकपात

ठाणे शहरात आणखी चार दिवस ५० टक्के पाणीकपात केली जाणार असून शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत प्रत्येक भागास दिवसातून १२ तास झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं याकाळात नागरिकांना कमी प्रमाणात आणि  अनियमित पाणीपुरवठा होईल, असं पाणीपुरवठा विभागानं कळवलं आहे. 

May 19, 2025 6:52 PM May 19, 2025 6:52 PM

views 24

नागपूर : OCW नं यंत्रणेत सुधारणा करावी, अन्यथा कारवाई होणार – नितीन गडकरी

नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूनं त्यांच्या यंत्रणेत एक महिन्याच्या आत सुधारणा करावी, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज अधिकाऱ्यांना दिला. पालिकेच्या सभागृहात केंद्रीय मंत्री गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणीपुरवठा आणि नागनदी प्रकल्पासह विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीत गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. 

May 13, 2025 3:29 PM May 13, 2025 3:29 PM

views 76

नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचं काम उद्या होणार आहे. त्यासाठी उद्या  दुपारी १२ वाजल्यापासून ते १५ मे रोजी दुपारी १२पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.   त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांमध्ये या काळात  पाणी पुरवठा होणार नाही तसंच गुरुवारी १५ मे रोजी संध्याकाळी कमी दाबाने  पाणीपुरवठा होईल.  नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन ...

April 9, 2025 7:25 PM April 9, 2025 7:25 PM

views 25

रत्नागिरीत टँकरनं पाणीपुरवठा

रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवू लागल्यानं जिल्ह्यात सर्वप्रथम रत्नागिरी तालुक्यात टँकरनं पाणीपुरवठा सुरू झाला आहे. रत्नागिरी शहरालगतच्या २५ वाड्यांना टँकरनं पाणी पुरवलं जात आहे. चिपळूण तालुक्यातल्या १४ गावांनी तर राजापूर आणि मंडणगड तालुक्यातल्या प्रत्येकी दोन गावांनी टँकरची मागणी केली आहे. रत्नागिरी शहरात आता दर सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातला पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरण्याचा अंदाज असल्यानं  पालिकेनं हे नियोजन केलं आहे.

October 17, 2024 7:49 PM October 17, 2024 7:49 PM

views 16

मुंबईत १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या  जलवाहिनीच्या यंत्रणेत  बिघाड झाल्यामुळे आज १७ आणि उद्या १८ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व ठिकाणी  ५ ते १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.  जलवाहिनीच्या यंत्रणेचं  दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु असून, या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे.