June 20, 2025 4:46 PM June 20, 2025 4:46 PM

views 12

राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी नद्याचं वाढलेलं पाणी प्रवाहात येत असल्याने विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पुण्याजवळ खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण ८४ टक्के भरल्याने १५ हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात आलं.   नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी गंगापूर धरणातून एक हजार १६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. &n...