July 4, 2025 9:09 AM July 4, 2025 9:09 AM

views 6

राज्याच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ

राज्याच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काल गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरेखोल, कर्लीसह काही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कर्ली नदी इशारा पातळीच्या वरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातली जगबुडी आणि राजापूर तालुक्यातली कोदवली या दोन नद्यांनीही इशारा पातळी ओलांडली ...

December 27, 2024 10:38 AM December 27, 2024 10:38 AM

views 7

जलसंधारणाचं महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाणलोट यात्रा काढण्यात येणार

जलसंधारणाचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचं, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, जल व भूमी व्यवस्थापन संस्था-वाल्मीत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.   वाल्मीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ५४६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, शासनस्तरावर पाठपुरावा, अधिक अनुदान मागणी तसंच पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावणार असल्याचं, राठोड यांनी सांगितलं.