December 12, 2025 3:32 PM

views 28

    वाशीम जिल्ह्यात रात्री झालेल्या गाडी अपघातात दोन जणांचा मृत्यु

    वाशीम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले तर दोन जण जखमी झाले. यवतमाळ इथून शिर्डीकडे जाणाऱ्या एका गाडीने पुढल्या गाडीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. धनज बुद्रुक पोलिस स्थानकाच्या हद्दीत हा अपघात झाला. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं.

February 7, 2025 5:23 PM

views 21

वंचित आणि मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कल्याणकारी योजना राबवणार

समाजातल्या वंचित आणि मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे.मात्र या योजनांचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचतो किंवा नाही,याची पाहणी आवश्यक असल्याचं मत राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केलं.वाशिम जिल्ह्यातल्या समाज कल्याण कार्यालयात काल विशेष आढावा बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते.  

January 11, 2025 3:42 PM

views 25

वाशिम इथं सव्वा कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी आरोपींना अटक

वाशिम इथं झालेल्या सव्वा कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली आहे. अमरावती विभागीय पोलिसांसह वाशिम, यवतमाळ आणि अकोला पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केली.   यासाठी पोलिसांच्या पथकाला ७० हजार रुपयांचं बक्षिसही देण्यात आलं. अमरावती विभागीय पोलिस महानिरीक्षक रामदास पोकळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ९ जानेवारीला विठ्ठल कृषी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांजवळून रक्कम या आरोपींनी लुटली होती.

December 12, 2024 3:31 PM

views 33

वाशिम आगारातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद

परभणी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतीच्या अवमानना प्रकरणी काल झालेल्या आंदोलनात अनेक एसटी बसचं नुकसान झालं होतं. सुरक्षेच्या दृष्टीनं आज सकाळपासून वाशिम आगारातून हिंगोली, परभणी, नांदेडकडे जाणाऱ्या एसटी गाड्या वाशिम आगारात थांबवण्यात आल्या आहेत. अकोल्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी गाड्याही वाशिम बस स्थानकावर उभ्या आहेत. यामुळे वाशिम येथील बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याची म...

October 13, 2024 3:29 PM

views 23

वाशिममध्ये वैद्यकीय उपकरणांचा कारखाना सुरू होणार – मंत्री नितीन गडकरी

वाशिम इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं असून त्याला पूरक अशा वैद्यकीय उपकरणांचा कारखाना वाशिम जिल्ह्यात लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज वाशिम इथं तपोनिधी या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या कारखान्यामुळे ३ हजार युवकांना रोजगार मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

October 8, 2024 3:01 PM

views 19

वाशिममधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

वाशिम जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या महाविद्यालयाला दोन वर्षांपूर्वी राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली होती.

September 25, 2024 3:42 PM

views 31

वाशीम जिल्ह्यात स्वछता अभियानांतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन

स्वछता अभियान २०२४ अंतर्गत वाशीम जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातल्या भुली इथल्या ग्रामस्वच्छता महिला मंडळाने अयोध्येत श्री रामजन्मभूमी इथे शरयू नदीच्या घाटावर स्वच्छता अभियान राबवलं. स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित या उपक्रमात ५१ महिलांनी सहभाग घेतला. तसंच, जिल्ह्यातल्या कामरगाव इथे आज क्लीन इंडिया मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला. हा कार्यक्रम वाशीम जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आला होता.

August 15, 2024 6:46 PM

views 24

वाशिम – समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तीन जखमी

वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमधे सात वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अपघातग्रस्त गाडी नागपूरहून मुंबईला जात असताना वाशिम जिल्ह्यात हा अपघात झाला. जखमींना अमरावती इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

August 2, 2024 5:52 PM

views 32

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध

वाशिम जिल्ह्यात पावसानं  सरासरी ओलांडली असली तरी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये मात्र पाण्याचा साठा वाढलेला नाही. या प्रकल्पात केवळ पस्तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या प्रकल्पातला जलसाठा वाढला नसल्याने वाशिमकरांमध्ये चिंता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी जपून वापरावं अशा सूचना पालिकेनं दिल्या आहेत.