January 24, 2025 3:33 PM January 24, 2025 3:33 PM

views 7

वक्फ सुधारणा विधेयकाबाबतच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक गदारोळामुळे स्थगित

वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत गदारोळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या १० खासदारांना समितीतून निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेस, डीएमके, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांचा यात समावेश आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या विरुद्ध असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप भाजपानं केला.   तर बैठकीचा विषय अचानक बदलल्याचा आणि दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बैठ...

September 25, 2024 3:16 PM September 25, 2024 3:16 PM

views 13

वक्फ सुधारणा विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर होणार

वक्फ सुधारणा विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन झालेली संसदेची संयुक्त समिती आपला अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करेल, अशी अपेक्षा केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरेन रिजुजु यांनी व्यक्त केली. समितीला एक कोटीपेक्षा जास्त निवेदनं प्राप्त झाली असंही रिजुजु यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूूर्ण झाल्याबद्दल रिजुजु दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. संयुक्त समिती विविध सरकारी आणि खासगी संस्थांकडून सूचना मागवत असून यावर व्यापक चर्चा सुरू असल्याचं ...

August 9, 2024 8:20 PM August 9, 2024 8:20 PM

views 7

वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत मंजूर झाला. या समितीत लोकसभेतले २१ तर राज्यसभेतले १० खासदार आहेत. लोकसभेतले जदंबिका पाल, निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्य, दिलीप साईकिया, गौरव गोगोई, नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे, अरविंद सावंत, इम्रान मसूद, मोहम्मद जावेद, असदउद्दीन ओवैसी, कल्याण बॅनर्जी या सदस्यांचा समावेश आहे. ही समिती संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी अहवाल सादर करील असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू य...