September 9, 2024 5:42 PM September 9, 2024 5:42 PM

views 6

वक्फ दुरुस्ती विधेयक वक्फ बोर्डाच्या जमिनी, बोर्डाचे कार्यक्षेत्र यामध्ये हस्तक्षेप करणारं – राज्य वक्फ बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल रऊफ शेख

लोकसभेत सादर केलेलं नवीन प्रस्तावित वक्फ दुरुस्ती विधेयक वक्फ बोर्डाच्या जमिनी, बोर्डाचे कार्यक्षेत्र यामध्ये हस्तक्षेप करणारं असल्याचा आरोप राज्य वक्फ बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल रऊफ शेख यांनी केला आहे. ते आज नागपुरात जमाते इस्लामी हिंदनं आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. या दुरुस्ती विधेयकात असंवैधानिक तत्वांचा अंतर्भाव केला आहे, असं ते म्हणाले. केंद्रीय वक्फ परिषद गठन करताना बिगरमुस्लिम सदस्यांचा समावेश, वक्फच्या जमिनी या महसूल जमिनी म्हणून घोषित करण्याचा जिल्हाधिका...

September 6, 2024 7:54 PM September 6, 2024 7:54 PM

views 10

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातल्या संयुक्त समितीची नवी दिल्लीत बैठक

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातल्या संयुक्त समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. विविध वक्फ मालमत्तांबाबतचं व्यवस्थापन आणि प्रशासन अधिक सक्षमतेनं व्हावं , यासाठी त्यातल्या त्रुटी वगळण्याची प्रक्रिया नवीन विधेयकामार्फत केली जाणार आहे.  भारतीय पुरातत्त्व विभाग,झकत प्रतिष्ठान, तेलंगणा वक्फ बोर्ड यांनी समितीसमोर आपापली मतं मांडली. लोकसभेचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या ३१ सदस्यांच्या या समितीत लोकसभेच्या २१ तर राज्यसभेच्या १० खासदारांचा समावेश आहे. 

August 22, 2024 7:36 PM August 22, 2024 7:36 PM

views 14

वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वरील संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत पार पडली

 वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वर  भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली  गठीत  करण्यात आलेल्या  संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज नवी दिल्ली इथं पार पडली. या ३१ सदस्यीय समितीमध्ये राज्यसभेतले २१ सदस्य आहेत, तर लोकसभेतले १० सदस्य आहेत. ही समिती या विधेयकाची छाननी करणार आहे.  बैठकीदरम्यान, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि कायदा आणि  न्याय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी कायद्याच्या मसुद्यात  प्रस्तावित केलेल्या विविध सुधारणांबद्दल माहिती दिली. वक्फ कायद्यामधल्या  उणिवा दूर करणं  आणि वक्फ माल...

August 13, 2024 8:01 PM August 13, 2024 8:01 PM

views 2

वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी जगदंबिका पाल यांची नियुक्ती

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ साठी गठीत करण्यात आलेल्या  संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदावर भाजपा  खासदार जगदंबिका पाल यांची नियुक्ती केली आहे. विधेयकावर पुढल्या पडताळणीसाठी ३१ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करेल.

August 11, 2024 1:33 PM August 11, 2024 1:33 PM

views 14

वक्फ सुधारणा विधेयक २०२४चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ चं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेली ‘जेपीसी’ अर्थात, संयुक्त संसदीय समिती, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लोकसभेला आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सोशल मीडियावरील संभाषणादरम्यान, दिली. या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख ही संसदीय समिती जाहीर करेल, मुस्लिमांसह,  सकारात्मक योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही संस्था किंवा व्यक्तींला या समितीच्या कामकाज प्रक्रियेत सहभागी होता येईल, असं त्यांनी ...