April 5, 2025 7:34 PM April 5, 2025 7:34 PM

views 10

वक्फ सुधारणा विधेयकाबाबातच्या गैरसमजुती दूर करणारं पत्रक जारी

वक्फ सुधारणा विधेयकाबाबातच्या गैरसमजुती दूर करणारं पत्रक केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने जारी केलं आहे. १९९५च्या वक्फ कायद्यापूर्वीची कोणतीही मालमत्ता या कायद्यान्वये ताब्यात घेतली जाणार नाही. तसंच वक्फ बोर्डात मुस्लिमेतर सदस्य असतील, परंतु ते बहुसंख्येने नसतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ स्वेच्छेने दान दिलेल्या मालमत्ताच वक्फ बोर्डाकडे वर्ग व्हाव्या आणि त्यांचं व्यवस्थापन पारदर्शी असावं याकरता हे विधेयक आणलं आहे, असं पत्रकात म्हटलं आहे

April 3, 2025 3:28 PM April 3, 2025 3:28 PM

views 21

वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर

वक्फ बोर्डाच्या जमिनींवषयीचं वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत चर्चेला आलं आहे. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं, की या विषयी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने एक कोटीपेक्षा जास्त सूचना आणि हरकतींचा अभ्यास करुन मसुदा तयार केला आहे. वक्फ जमिनींचा योग्य वापर झाला असता तर देश बदलला असता अशी आशा त्यांनी व्यक्त केली.    लोकसभेत काल रात्री उशिरा वक्फ सुधारणा विधेयक २०२५ मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं २८८ सदस्यांनी मतदान केलं, तर २३२ सदस्यांनी वि...

April 2, 2025 9:36 AM April 2, 2025 9:36 AM

views 7

वक्फ सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार विभागाचाही कार्यभार असून ते आज सभागृहात हे विधेयक मांडतील.   विधेयकावर ८ तासांची चर्चा घेण्यात येईल आणि सभागृहाला आवश्यक वाटल्यास चर्चेचा कालावधी वाढवण्यात येईल असं त्यांनी संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांना सांगितलं. या विधेयकाबाबत कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची सरकारची तयारी आहे, असं सांगून रीजीजू म्हणाले की विरोधी पक्षांना अनुनयाचं धोरण राबवायचं असल्याने ते या विधेयकाला...