November 27, 2024 8:32 PM November 27, 2024 8:32 PM

views 7

वक्फ बोर्डासंबधीच्या संयुक्त संसदीय समिती वक्फ बोर्ड कायद्याचा मसूदा येत्या २९ तारखेला पटलावर मांडण्याची शक्यता

वक्फ बोर्डासंबधीच्या संयुक्त संसदीय समिती वक्फ बोर्ड कायद्याचा मसूदा येत्या २९ तारखेला पटलावर मांडण्याची शक्यता आहे, परंतू या समितीनं अनेक राज्यांमधल्या बोर्डाच्या हरकती ऐकून घेतलेल्या नाहीत त्यामुळे समितीची मुदत वाढवावी अशी मागणी या समितीचे सदस्य असलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारानी केली आहे. समितीनं बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांचा दौरे केले नाहीत, तसंच दिल्ली, जम्मू काश्मीर, पंजाब आणि उत्तर प्रदेश सरकारची बाजू ऐकलेली नाही असं विरोधी पक्षांच्या सदस्यांनी म्हटलं आहे. समितीने एकूणच कामकाज गंभीरप...

October 22, 2024 8:36 PM October 22, 2024 8:36 PM

views 8

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना पुढच्या बैठकीला हजेरी लावायला मनाई

वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन झालेल्या संसदेच्या संयुक्त समितीनं तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना पुढच्या बैठकीला हजेरी लावायला मनाई केली आहे. संसदेत आज झालेल्या बैठकीत बॅनर्जी यांनी गैरवर्तन केल्यानंतर हा निर्णय झाला. भाजपा खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यासोबत बॅनर्जी यांचा वाद झाला, त्यानंतर त्यांनी गैरवर्तन केल्याचं सुत्रांनी सांगितलं. ओडिशातल्या काही संघटना आणि इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीगच्या खासदाराचं म्हणणं ऐकून घेताना हा प्रकार घडला.