April 25, 2025 8:46 PM April 25, 2025 8:46 PM

views 10

क्फच्या कारभारात पारदर्शिता आणण्यासाठी वक्फ सुधारणा कायदा केल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण

१९९५ च्या वक्फ कायद्याचा गैरवापर, आणि सरकारी जमिनींवर अतिक्रमण रोखण्यासाठी, तसंच वक्फच्या कारभारात पारदर्शिता आणण्यासाठी  वक्फ सुधारणा कायदा केल्याचं केंद्रसरकारने म्हटलं आहे. वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज केंद्रसरकारने प्राथमिक जबाबाचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं.पुरेशा कायदेशीर तरतुदींअभावी अनेक सरकारी आणि खासगी मालकीच्या जमिनी औकाफ जमिनी म्हणून घोषित झाल्या होत्या, असा दावा त्यात केला आहे. वक्फ मालमत्तेचं पारदर्शी व्यवस्थापन इस्लामच्या तत्वांचा भंग न करता व्हावं या एकमेव हेत...

April 7, 2025 8:46 PM April 7, 2025 8:46 PM

views 11

वक्फ सुधारणा विधेयकाच्या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्याबाबत न्यायालयाची सहमती

वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने जमियत उलेमा ए हिंदच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादाची दखल घेतली, या संदर्भात इतरही अनेक याचिका असून, त्यावर तत्काळ सुनावणी आवश्यक असल्याचं, सिब्बल यांनी म्हटलं आहे.

April 4, 2025 7:48 PM April 4, 2025 7:48 PM

views 12

वक्फ सुधारणा विधेयक राज्यघटनेमधल्या तरतुदींप्रमाणे असल्याचं भाजपचं मत

संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झालेलं वक्फ सुधारणा विधेयक पूर्णपणे राज्यघटनेमधल्या तरतुदींप्रमाणे असल्याचं मत भाजपाचे ज्येष्ठ नेते रवि शंकर प्रसाद यांनी आज संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केलं. वक्फ विधेयक राज्यघटनेच्या मूळ तत्त्वांचंच  उल्लंघन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी केला आहे. त्याबद्दल प्रसाद बोलत होते.  या विधेयकाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचा मनोदय काँग्रेसनं व्यक्त केला असून आपला लढा संसदेत आणि जनतेच्या न्यायालयातही सुरूच राहील असंही म्हटलं आहे. 

April 3, 2025 8:18 PM April 3, 2025 8:18 PM

views 17

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणल्याचं अल्पसंख्यक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं. वक्फच्या मालमत्तेत मुस्लिमेतर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही, याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल, असं रिजीजू यांनी स्पष्ट  केलं. या विधेयकाचा हेतू वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं असून मुस्लिमांच्या  धार्माचरणात हस्तक्षेप करण्याचा नाही असंही त्यांनी सांगितलं.    वक्फ सुधारणा विधेयक आणून सरकार समाजात विभाजन कर...

April 2, 2025 8:24 PM April 2, 2025 8:24 PM

views 14

वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम सदस्यांची नेमणूक करणार नसल्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा निर्वाळा

वक्फ बोर्डावर एकही बिगर मुस्लिम सदस्याची नियुक्ती करणार नसल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत दिला. मुस्लिमांची धार्मिक वागणूक आणि त्यांनी दान केलेल्या संपत्तीमध्ये हे विधेयक कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. अल्पसंख्यक मतदारांमध्ये भिती निर्माण करण्यासाठी गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

April 2, 2025 8:09 PM April 2, 2025 8:09 PM

views 12

Waqf Amendment Bill : वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव दूर होणार

वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे. विधेयकातल्या या आणि इतर तरतुदी पुढीलप्रमाणे :   वक्फच्या नोंदींचं डिजिटायजेशन करणं, वक्फ मालमत्तांचं ऑडिट करणं, मालमत्तेचं सर्वेक्षण पूर्ण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे. नव्या सुधारणेनुसार वक्फ बोर्डात मुस्लिम समुदायातल्या मागास घटकांना आणि महिलांना प्रतिनिधीत्व दिलं जाईल. या विधेयकामुळे वक्फच्या मालमत्तेवर शैक्षणिक संस्था, शॉपिंग सेंटर, निवासी इमारत उभारण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला मिळणार आहे.    सं...

April 2, 2025 7:42 PM April 2, 2025 7:42 PM

views 12

वक्फ सुधारणा विधेयकाचं सत्ताधाऱ्यांकडून स्वागत, विरोधकांची टीका

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील धर्मनिरपेक्षता वक्फ सुधारणा विधेयकातून प्रतिबिंबित होत असल्याचं प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात किंवा कोणाच्याही आस्थेला ठेस पोहचविणारे नाही. त्यामुळे ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जिवंत आहे अशी प्रत्येक व्यक्ती या सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवेल असं ते म्हणाले.   जुन्या कायद्यात वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार होते. चुकीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची मुभा नव्हती. हे सुधारणा ...

February 2, 2025 10:38 AM February 2, 2025 10:38 AM

views 12

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समितीनं दिलेला अहवाल उद्या मांडणार

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समितीनं दिलेला अहवाल उद्या म्हणजे सोमवारी लोकसभेत मांडला जाणार आहे. समितीचे अध्यक्ष जगंदबिका पाल आणि सदस्य संजय जयस्वाल हा अहवाल सादर करणार आहेत. समितीनं अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे हा अहवाल गुरुवारीच सुपूर्द केला आहे.

January 30, 2025 5:18 PM January 30, 2025 5:18 PM

views 11

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सादर

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आज आपला अहवाल लोकसभा सभापतींना सादर केला. या विधेयकासंबंधी 14 सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत. 31 सदस्यीय समितीचे  अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सभापती ओम बिरला यांना हा अहवाल सादर केला. नोंदणीचं डिजीटायझेशन, लेखापरीक्षण, बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या वक्फ मालमत्ता परत मिळवण्यासाठी कायदेशीर यंत्रणेत महत्त्वपूर्ण सुधारणा अशा बाबींचा विधेयकांत समावेश आहे.   संयुक्त संसदीय समितीवरच्या विरोधी पक्ष सदस्यांनी हा अहवाल स्वीकारण्यावर प्रश्न...

September 14, 2024 3:00 PM September 14, 2024 3:00 PM

views 21

वक्फ सुधारणा विधेयकाला मुस्लिम बांधवांचं समर्थन असल्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचा दावा

वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल कुणाच्याही मनात कोणताही संभ्रम असण्याची गरज नाही. काही लोक या विधेयकाला विरोध करत असले, तरी बहुतेक मुस्लिम बांधवांनी या विधेयकाला समर्थन दिलं आहे, असा दावा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. मुंबईत पारसी समुदायाच्या कार्यक्रमानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मात्र या विधेयकाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून कुणीही नागरिकांची दिशाभूल करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.