May 21, 2025 9:31 AM May 21, 2025 9:31 AM

views 14

वक्फ दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी

वक्फ सुधारणा कायदा 2025 ला अंतरिम आदेश देण्याच्या मुद्द्यावर आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. या कायद्याला स्थगिती देण्यासाठी ठोस मुद्दे मांडावे लागतील असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे की, न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्यांमध्ये असंवैधानिकता दिसून येत नाही तोपर्यंत हस्तक्षेप करता येत नाही. खंडपीठ आज केंद्र सरकारची बाजू ऐकणार आहे.  

May 20, 2025 1:36 PM May 20, 2025 1:36 PM

views 9

वक्फ दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी

वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाद्वारे, वापरकर्त्याद्वारे  अथवा कराराद्वारे एखादी मालमत्ता वक्फ नसल्याचं सिद्ध करण्याच्या तरतुदीबद्दल  अंतरिम आदेश देणं, राज्य वक्फ मंडळ आणि केंद्रीय वक्फ मंडळात मुस्लिमेतर सदस्यांना प्रवेश देण्याची तरतूद  आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर एखादी मालमत्ता सरकारची असल्याचं सिद्ध झाल्यास ती वक्फ मानली जाणार नाही, या तरतुदींवर याचिकाकर्त्यांना असलेल्या आक्षेपावर ही सुनावणी घेतली...

April 17, 2025 9:35 AM April 17, 2025 9:35 AM

views 15

सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयक २०२५ बाबत आज सुनावणी सुरू राहणार

सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयक २०२५बाबत आज सुनावणी सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचं तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ काल या विधेयकाबाबत अंतरिम आदेश देणार होतं, मात्र खंडपीठानं विचारलेल्या तीन प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी केंद्र सरकारनं वेळ मागून घेतल्यानं तो स्थगित करण्यात आला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजयकुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्यापुढे याबाबत सुनावणी सुरू आहे. वक्फ मंडळांचे आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिमच असायला हवेत, असा आदेश...