September 15, 2025 3:44 PM

views 16

वक्फ सुधारणा कायद्याला पूर्ण स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सर्वोच्च न्यायालयानं वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला पूर्णपणे स्थगिती द्यायला नकार दिला असून या कायद्यातल्या काही तरतुदींना स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला.   वक्फ करण्यासाठी देणगीदार किमान पाच वर्षे इस्लाम धर्माचा अनुयायी असावा ही तरतूद न्यायालयानं स्थगित केली आहे. वक्फ मालमत्तेचं सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण झालं की नाही हे ठरवण्याचा अधिकार शासनानं नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल करण्यालाही खंडपीठानं स्थगिती दिली...

May 5, 2025 1:24 PM

views 22

वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी

वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासह न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.   या संदर्भात यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं  काही मुद्द्यांवर चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारनं कायद्यातल्या काही  तरतुदींना स्थगिती  दिली आहे. नोंदणीकृत  आणि अधिसूचित वक्फ मालमत्ता तसंच वापरकर्त्यांकडून वक्...

April 22, 2025 3:20 PM

views 11

वक्फ कायद्यात सुधारणा

गरीब मुस्लिमांच्या भल्यासाठीच वक्फ कायद्यात सुधारणा केल्याचा पुनरुच्चार केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रीजिजू यांनी आज केला. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. लवकरच वक्फ मालमत्तांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून जगातली सर्वात मोठी वक्फ मालमत्ता देशात असल्याचं ते म्हणाले.    वक्फ सुधारणा कायद्याच्या बाबतीत विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.    देशाच्या इतिहासात पह...

April 10, 2025 1:43 PM

views 15

वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी

वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठासमोर १६ एप्रिल रोजी ही सुुनावणी होईल. या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

April 5, 2025 7:34 PM

views 15

वक्फ सुधारणा विधेयकाबाबातच्या गैरसमजुती दूर करणारं पत्रक जारी

वक्फ सुधारणा विधेयकाबाबातच्या गैरसमजुती दूर करणारं पत्रक केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने जारी केलं आहे. १९९५च्या वक्फ कायद्यापूर्वीची कोणतीही मालमत्ता या कायद्यान्वये ताब्यात घेतली जाणार नाही. तसंच वक्फ बोर्डात मुस्लिमेतर सदस्य असतील, परंतु ते बहुसंख्येने नसतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ स्वेच्छेने दान दिलेल्या मालमत्ताच वक्फ बोर्डाकडे वर्ग व्हाव्या आणि त्यांचं व्यवस्थापन पारदर्शी असावं याकरता हे विधेयक आणलं आहे, असं पत्रकात म्हटलं आहे

April 4, 2025 1:18 PM

views 13

वक्फ सुधारणा विधेयकाला राज्यसभेची मंजुरी

  वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५  काल  राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. सुमारे १२ तासांच्या चर्चेनंतर १२८ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं, तर, ९५ सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं.  हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं आहे.   या विधेयकाचा फायदा विधेयकाचा लाभ केवळ आणि केवळ मुस्लिम समुदायाला होणार असून, वक्फ बोर्डाकडे असलेल्या संपत्ती व्यवस्थापनात बिगर मुस्लिम समुदायाचा हस्तक्षेप असणार नाही, असं,  अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी चर्चेला उत्तर देताना  सांगितलं.   राज्यसभेत क...

April 3, 2025 3:36 PM

views 26

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे.  संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणण्यात आल्याचं अल्पसंख्यक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं.  वक्फच्या मालमत्तेत मुस्लिमेतर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही, याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल, असं रिजीजू यांनी स्पष्ट  केलं. या विधेयकाचा हेतू वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं असून मुस्लिमांच्या  धार्माचरणात हस्तक्षेप करण्याचा नाही असंही त्यांनी सांगितलं.    वक्फ सुधारणा विधेयक आणून सरकार समाजात ...

April 3, 2025 3:28 PM

views 25

वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर

वक्फ बोर्डाच्या जमिनींवषयीचं वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत चर्चेला आलं आहे. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं, की या विषयी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने एक कोटीपेक्षा जास्त सूचना आणि हरकतींचा अभ्यास करुन मसुदा तयार केला आहे. वक्फ जमिनींचा योग्य वापर झाला असता तर देश बदलला असता अशी आशा त्यांनी व्यक्त केली.    लोकसभेत काल रात्री उशिरा वक्फ सुधारणा विधेयक २०२५ मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं २८८ सदस्यांनी मतदान केलं, तर २३२ सदस्यांनी वि...

April 2, 2025 7:08 PM

views 18

वक्फ सुधारणा विधेयकावरून सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचै आरोप

वक्फ सुधारणा विधेयक, संविधान विरोधी असून सरकार त्यावरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी लोकसभेत यावरच्या चर्चेला सुरुवात करताना केला. हे विधेयक आणून संविधान कमकुवत करण्याचा, अल्पसंख्याक समाजाला बदनाम करण्याचा आणि भारतीय समाजात दुफळी माजवण्याचा सरकारचा  डाव आहे, अशी टीका त्यांनी केली. या विधेयकातल्या सुधारणांमुळे आणखी समस्या निर्माण होतील, असं ते म्हणाले.     केंद्र सरकारनं बेरोजगारी, महागाई, नोटाबंदी आणि इतर आघाड्यांवर आलेलं अपयश झाकण्यासाठी हे विधेयक आणलं आहे अ...

April 2, 2025 1:12 PM

views 12

वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्याचं राजकारण न करता तर्काच्या आधारे विरोध करावा- किरेन रिजिजू

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गरीब मुसलमानांच्या हिताचा विचार करत असून विरोधी पक्षांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्याचं राजकारण न करता तर्काच्या आधारे विरोध करावा, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. विधेयक सादर करण्यापूर्वी नवी दिल्ली इथे संसद परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.