April 16, 2025 4:00 PM April 16, 2025 4:00 PM

views 7

वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला रोहित शर्मा ह्याचं नाव

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.  आणखी दोन स्टँडचं नामकरण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि माजी क्रिकेटपटू दिवंगत अजित वाडेकर यांच्या नावे करण्याला या बैठकीत मान्यता मिळाली.      वानखेडे स्टेडीयम मधे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विजय मर्चंट आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गजांच्या नावाचे स्टँड आधीपासूनच आहेत. 

January 10, 2025 7:42 PM January 10, 2025 7:42 PM

views 5

वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त १२ ते १९ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम

 मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमच्या उभारणीला यंदा ५० वर्षं पूर्ण होत असून सुवर्णमहोत्सवानिमित्त १२ ते १९ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. १९ जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमात विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, दिलीप वेंगसरकर आणि डायना एदल्जी यांच्यासह इतर दिग्गज सहभागी होणार आहेत. या काळात विविध प्रदर्शनं, मनोरंजनाचे कार्यक्रम, लेझर शो देखील आयोजित केले जाणार आहेत.

December 19, 2024 6:52 PM December 19, 2024 6:52 PM

views 4

वावखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त जानेवारीत भव्य सोहळा

मुंबईत असलेल्या वावखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त जानेवारीत भव्य सोहळा होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सोहळ्याची सुरुवात १२ जानेवारीला होईल तर समारोप १९ जानेवारीला  होणार आहे. यावेळी वानखेडेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाच्या विशेष लोगोचं अनावरण होणार आहे. १९ जानेवारीला एक स्मृती टपाल तिकीट आणि एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या सोहळ्यासाठी आजी माजी दिग्गज क्रिकेटपटू एकत्र येतील...