May 9, 2025 8:12 PM May 9, 2025 8:12 PM
1
फ्रिक्वेन्सीची माहिती नसलेल्या वॉकी टॉकी उपकरणांवर कारवाई होणार
ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीला असलेल्या परवान्याची माहिती नसलेल्या, फ्रिक्वेन्सीची माहिती नसलेल्या वॉकी टॉकी उपकरणांवर कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणानं दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ नये यासाठी विक्रेत्यांनी नियमांचं पालन करावं असं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. .