December 28, 2025 7:15 PM December 28, 2025 7:15 PM
1
पालघर जिल्हा परिषदेनं वाडा खडकोना इथं एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पालघर जिल्हा परिषदेनं वाडा खडकोना इथं एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळं पावसाचं पाणी अडवलं जाणार आहे. त्यामुळं भूजल पातळी वाढून स्थानिक शेतीसाठी पुरेसा जलसाठा निर्माण होणार आहे. मातीची धूप रोखण्यासाठी तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही या बंधाऱ्याचा लाभ होणार आहे.