November 9, 2024 5:04 PM November 9, 2024 5:04 PM

views 12

पालघर जिल्ह्यातल्या वाडा पोलिसांनी ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

पालघर जिल्ह्यात वाडा पोलिसांनी आज एका बनावट एटीएम व्हॅन मधली ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. नवी मुंबईतल्या ऐरोली इथून आणलेली ही रक्कम विक्रमगड बँकेत नेली जात असल्याचा बनाव करण्यात येत होता. मात्र त्याबाबत समाधानकारक उत्तरं तसंच पुरावे न मिळाल्यामुळं पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. या रकमेचा वापर निवडणुकीसाठी केला जाणार होता का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.