October 29, 2024 1:34 PM October 29, 2024 1:34 PM
19
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८ ते १५नोव्हेंबर या कालावधीत चार टी-20 सामने खेळणार आहे. विद्यमान राष्ट्रीय प्रशिक्षक, गौतम गंभीर बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार असल्यामुळे या दौऱ्यासाठी लक्ष्मण यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं बीसीसीआयच्या पत्रकात म्हटलं आहे.