November 7, 2025 8:53 PM November 7, 2025 8:53 PM

views 29

VVPAT वापर न करायच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटिस

महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं आज राज्य निवडणूक आयोगाला नोटिस बजावली आणि पुढच्या आठवड्यापर्यंत आपलं म्हणणं मांडायचे निर्देश दिले. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडघे यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली.

October 29, 2025 9:10 PM October 29, 2025 9:10 PM

views 113

महाराष्ट्रात, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे महाराष्ट्रात, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. काही अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेतल्या जातात. त्यासाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेली मतदान यंत्रं विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणुक आयोगांची टेक्निकल इव्हॅल्यूशन कमिटी अभ्यास करत आहे, तिचा अहवाल अद्याप न आल्यानं व्हीव्हीपॅटचा वाप...

April 7, 2025 6:35 PM April 7, 2025 6:35 PM

views 27

VVPAT रिसीटची शंभर टक्के हातानं मोजणीची मागणी करणारी याचिका फेटाळली

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामधल्या व्हीव्हीपॅट रिसीटची शंभर टक्के हातानं मोजणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजयकुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्यापुढं आज यावर सुनावणी झाली. संबंधित याचिकाकर्त्यानं दाखल केलेली जनहितार्थ याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं याआधी फेटाळली आहे. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असं या पीठानं सांगितलं.