July 1, 2025 2:57 PM July 1, 2025 2:57 PM
4
विधानसभेत नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाली. अधिक व्याज देणाऱ्या किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे, अशा कंपन्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. आर्थिक गुन्हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे, जनतेनं देखील अशा फसव्या योजनांवर विश्वास ठेवू नये, असं ते म्हणाले. बीड जिल्ह...