December 23, 2024 1:04 PM December 23, 2024 1:04 PM
6
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चौधरी चरणसिंग यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज चौधरी चरणसिंग यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले की, २००१ सालापासून चौधरी चरणसिंह यांची जयंती किसान दिन म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरणसिंह यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासासाठी आपलं जीवन समर्पित केले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे की, चौधरी चरणसिंह गरीब आणि शेतकऱ्यांचे सच्चे हितचिंतक होते.