November 29, 2025 12:51 PM

views 23

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उद्या हरियाणा दौऱ्यावर

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उद्या हरियाणात कुरुक्षेत्र इथं भेट देणार आहेत. कुरुक्षेत्र इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या २० व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखिल भारतीय देवस्थान संमेलनाला देखील ते उपस्थित राहतील.