October 18, 2024 9:19 AM October 18, 2024 9:19 AM

views 13

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दोन दिवसांची मुदत

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. उद्या १९ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी असून, निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. सर्व मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी.     ज्यांनी अजून मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनी उद्यापर्यंतच्या मुदतीत नाव नोंदणी करून घेण्याचं आवाहन, मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस....