July 11, 2025 8:20 PM July 11, 2025 8:20 PM

views 24

महानगरपालिका निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या तपासणीला सुरूवात

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करावी ती मतदानासाठी सज्ज करावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ...

October 18, 2024 9:19 AM October 18, 2024 9:19 AM

views 13

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दोन दिवसांची मुदत

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. उद्या १९ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी असून, निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. सर्व मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी.     ज्यांनी अजून मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनी उद्यापर्यंतच्या मुदतीत नाव नोंदणी करून घेण्याचं आवाहन, मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस....

July 7, 2024 2:15 PM July 7, 2024 2:15 PM

views 16

फ्रान्समध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान

फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. विद्यमान संसदेचा तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असतानाच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ९ जून रोजी संसद विसर्जित करून मद्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे.   पहिल्या टप्प्यात मरीन ले पेन यांच्या नॅशनल रॅली या उजव्या विचारसरणीच्या पक्षाला ३० टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि नॅशनल रॅली पक्षाने जर स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २८९ जागा जिंकल्या, तर पक्षाचे नेते जॉर्डन बार्डेला यांची प्रधान...