November 18, 2025 6:46 PM
15
देशभरात ५० कोटी ९७ लाखापेक्षा जास्त नोंदणी अर्ज वितरित
मतदारयाद्यांचं विशेष सखोल पुनरिक्षण करण्याच्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरात ५० कोटी ९७ लाखापेक्षा जास्त नोंदणी अर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. पुनरिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात ५१ कोटी मतदारांची पडताळणी असून त्यातल्या ९८ पूर्णांक ५४ शतांश टक्के मतदारांना हे अर्ज मिळाले आहेत. ९ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशात हा टप्पा राबवला जात असून उत्तर प्रदेशात १५ कोटी तर पश्चिम बंगालमधे ७ कोटी मतदारांना हे अर्ज दिले आहेत. ४ नोव्हेंबरपासून सुरु झालेला पुनरिक्षणाचा हा टप्पा...