November 30, 2025 2:21 PM November 30, 2025 2:21 PM
15
मतदारयाद्या पुनर्रिक्षणाची मुदत वाढली
मतदारयाद्या पुनर्रिक्षणाची मुदत केंद्रीय आयोगाने आठवडाभराने वाढवली आहे. ९ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधे सध्या ही प्रक्रीया सुरु आहे. सुधारित अधिसूचनेनुसार मतदारयादीत नाव नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. प्रारूप मतदार याद्या १६ डिसेंबरला प्रसिद्ध होतील. पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारीला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध होतील.