December 13, 2025 1:37 PM December 13, 2025 1:37 PM

views 5

पश्चिम बंगालमध्ये SIR दरम्यान २००२ च्या मतदार यादीत त्रुटी

पश्चिम बंगालमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेदरम्यान आई-वडील, नातेवाईकांच्या नावांच्या आधारे मतदारांची ओळख पटवताना २००२ च्या मतदार यादीत अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेष सखोल पुनरिक्षणाचा पहिला टप्पा संपला असला तरी निवडणूक आयोग सातत्यानं याद्यांची पडताळणी करत आहे.    ८५ लाख १ हजार ४८६ मतदारांच्या वडिलांचे नाव चुकीचे असल्याचे आढळले. हे प्रमाण एकूण मतदारांच्या ११ पूर्णांक ९ दशांश टक्के आहे. आई-वडिल आणि मुलांच्या वयातल्या अंतरात मोठी तफावत आढळून येण्याचं प्रमाणही खूप आहे. वय ४५ ...

October 15, 2025 5:51 PM October 15, 2025 5:51 PM

views 148

मतदारयादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका पुढे ढकण्याची विरोधकांची मागणी

मतदारयादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी महाविकास आघाडी आणि काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. विविध विरोधी पक्षांच्या प्रतिनिधीमंडळाची आज मुंबईत निवडणूक आयोगाबरोबर चर्चा झाली, त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या यादीतल्या त्रुटी दूर कराव्या, VVPAT चा वापर करावा, आदी मागण्या विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत...

September 30, 2025 9:11 PM September 30, 2025 9:11 PM

views 69

बिहारमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, साडे २१ लाख मतदारांची वाढ

बिहारमध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या नंतर विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. मसुदा मतदार यादीच्या तुलनेत या यादीत २१ लाख ५३ हजार मतदार वाढले आहेत तर ३ लाख ६६ हजार मतदार कमी झाले आहेत.    २४ जून २००५ रोजी ७ कोटी ८९ लाख मतदार बिहारमध्ये होते. त्यातले ६५ लाख मसुदा यादीत वगळले गेले, त्यानंतर ७ कोटी २४ लाख मतदार यादीत होते. आज प्रसिद्ध झालेल्या यादीत ७ कोटी ४२ लाख मतदार आहेत.

September 20, 2025 10:52 AM September 20, 2025 10:52 AM

views 57

 मतदार यादीतून मतदारांची नावं परस्पर काढून टाकली जाऊ शकत नाही – निवडणूक आयोग

ऑनलाईन किंवा कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाकडून मतदार यादीतून मतदारांची नावं परस्पर काढून टाकली जाऊ शकत नसल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगानं पुनरुच्चार केला आहे. कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघात कुठल्याही मतदाराची नावं चुकीच्या पद्धतीनं काढू टाकली गेलेली नसल्याचंही आयोगानं म्हटलं आहे. मतदारांची नावं संशयास्पदरीत्या काढून टाकण्याचा प्रयत्नांबद्दल खुद्द निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच 2023 मध्ये पोलिसांकडे एफआयआर नोंदवला होता, असा खुलासाही आयोगानं केला आहे. तसंच आयोगानं महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात...