October 22, 2024 11:27 AM
10
राज्यात आतापर्यंत ९ कोटी ६३ लाखांहून अधिक मतदारांची नोंद
राज्यात आतापर्यंत नऊ कोटी ६३ लाखांहून अधिक मतदारांची नोंद झाली आहे.त्यात सुमारे एक कोटी ८५ लाख हे २० ते २९ वयोगटातले मतदार आहेत. २० लाख ९३ हजारांहून अधिक मतदारांनी यंदा पहिल्यांदाच मतदार यादीत नाव नोंदवलं आहे. कातकरी, कोलम, मारिया गोंड या आदिवासी जमातींमधल्या सर्व २ लाख ७७ हजार मतदारांची नोंद मतदार यादीत केल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.विधानसभा निवडणुकीसाठी एकूण एक लाख १८६ मतदार केंद्र असतील. त्यातले ४२ हजार ६०४ केंद्रं शहरी तर ५७ हजार ५८२ केंद्रं ग्रामीण भागात आहेत.