October 28, 2025 3:20 PM October 28, 2025 3:20 PM
51
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारत वचनबद्ध-राष्ट्रपती
भारत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वचनबद्ध असून त्या दिशेने ठोस पावलं उचलत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज नवी दिल्लीत आयएसए अर्थात आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या आठव्या अधिवेशनाला संबोधित करत होत्या. हवामान बदलाचा संपूर्ण जगावर गंभीर परिणाम होत आहे. त्याचा सामना करण्यासाठी तातडीने आणि ठोस पावलं उचलण्याची गरज असून त्यासाठी सूर्य हा सौर उर्जेचा शाश्वत स्रोत महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. अनेक देशवासीय आज छठपूजेच्या निमित्ताने सूर्याचं पूजन करत आ...