March 29, 2025 7:46 PM March 29, 2025 7:46 PM

views 5

Voice of America: बंद करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय फेडरल न्यायाधीशांनी फेटाळला

व्हाईस ऑफ अमेरिका ही वृत्तसंस्था बंद करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय अमेरिकन फेडरल न्यायाधीशांनी फेटाळून लावला आहे. हा निर्णय मनमानी कारभाराचं उदाहरण असल्याचं न्यायाधीश जेम्स पॉल ओटकन यांनी म्हटलं आहे.  मात्र वृत्तसंस्थेचं प्रसारण पुन्हा सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले नाहीत. पण या न्यायालयाच्या या निर्णयामुळे बाराशे पत्रकार, अभियंते आणि इतर कर्मचारी सक्तीच्या रजेवर जाण्यापासून बचावले आहेत.