September 13, 2024 8:15 PM September 13, 2024 8:15 PM
11
नौदलासाठी तयार केलेल्या VLSRSAM क्षेपणास्त्राची चाचणी सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी
नौदलासाठी तयार केलेल्या VLSRSAM क्षेपणास्त्राची चाचणी सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी झाली. जमिनीवरुन हवेत मारा करु शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची ओदिशात चंडीपूर इथं कालही एक चाचणी झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या कामगिरीबद्दस संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओचं अभिनंदन केलं. या क्षेपणास्त्रानं अत्यंत कमी उंचीवरून उडणाऱ्या आणि रडारवर न दिसणाऱ्या अतिवेगवान हवाई लक्ष्यावर अचूक हल्ला केला आणि लक्ष्य निष्प्रभ करण्याची आपली क्षमता सिद्ध केली.