December 21, 2025 2:53 PM

views 24

युक्रेन रशिया युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेच्या शिष्टमंडळानं घेतली रशियन अधिकाऱ्यांची भेट 

युक्रेनमध्ये रशियानं छेडलेलं युद्ध संपवण्यासाठी झालेल्या चर्चेच्या नव्या फेरीत, अमेरिकेच्या शिष्टमंडळानं काल फ्लोरिडा मध्ये रशियन अधिकाऱ्यांची भेट घेतली. ही चर्चा सकारात्मक होती, आणि ती आजही सुरु राहील, असं  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विशेष दूत किरील दिमित्रीव्ह यांनी बातमीदारांना सांगितलं.  दरम्यान, दोन्ही बाजूंनी ओलीसांची देवाणघेवाण सुलभ झाली, आणि राष्ट्रीय नेत्यांमधल्या बैठकींचा मार्ग मोकळा झाला, तर युक्रेन, अमेरिका आणि रशियाबरोबर त्रिपक्षीय चर्चेच्या प्रस्तावाला पाठिंबा देईल, असं ...

December 4, 2025 8:04 PM

views 37

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन नवी दिल्लीत दाखल

२३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन नवी दिल्लीत पोहोचले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. त्यापूर्वी दोन्ही देशांच्या विविध मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली.   रशिया हा भारताचा काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला खास आणि धोरणात्मक भागिदार असून, जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही देशांमधले संबंध सातत्यानं दृढ होत आहेत, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत लष्कर आणि...

October 3, 2025 1:43 PM

views 45

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर

भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबरमधे भारत दौऱ्यावर येणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा करतील. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्केव यांनी काल या वृत्ताला दुजोरा दिला. युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंरचा पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.

June 21, 2025 2:51 PM

views 18

मॉस्कोच्या कृती आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलं जाईल- व्लादिमिर पुतीन

भारत आणि रशिया दरम्यानच्या दीर्घकालीन सहकार्याबाबत मॉस्कोच्या कृती आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलं जाईल असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटलं आहे. ते काल सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचाच्या पूर्ण सत्राला संबोधित करत होते.    ‘सामायिक मूल्य:बहुध्रुवीय जगातला विकासाचा पाया’, ही सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंच २०२५ ची संकल्पना आहे.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या परिषदेत  भारताचं प्रतिनिधित्व केलं. परिषदेच्या दोन सत्रांमध्ये त्य...

March 14, 2025 1:25 PM

views 53

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची जागतिक नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त

युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी सातत्यानं लक्ष घातल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते.  जागतिक स्तरावर अनेक आव्हानं असूनदेखील युद्धग्रस्त भागात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी दाखवलेल्या वचनबद्धतेबद्दल त...

September 26, 2024 2:05 PM

views 16

युक्रेनला अण्वस्त्र पुरवणारा देश युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा

रशिया विरुद्धच्या युद्धात यूक्रेनला अण्वस्त्र पुरवल्यास संबंधित देशही त्या युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. मॉस्को इथं काल झालेल्या रशियाच्या सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. यूक्रेनने या युद्धात लांब पल्ल्याच्या पाश्चात्त्य क्षेपणास्त्रांचा वापर करण्यासाठी अमेरिका आणि युरोपमधल्या आपल्या मित्र राष्ट्रांकडून परवानगी मागितली आहे, असं यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.